कणकवली तालुका पत्रकार संघाचा २८ रोजी पुरस्कार वितरण सोहळा

2

आदर्श उद्योजक, सामाजिक कार्यकर्ता, पत्रकार, छायाचित्रकार पुरस्कारांचे वितरण

कणकवली, ता.24 ः कणकवली तालुका पत्रकार संघाचा वार्षिक पुरस्कार वितरण सोहळा बुधवारी 28 ऑगस्ट 2019 रोजी सकाळी 10 वाजता कणकवली कॉलेजच्या एचपीसीएल सभागृहात होणार आहे. या कार्यक्रमात आदर्श उद्योजक पुरस्कार – दिनेश नारकर (फोंडाघाट), आदर्श सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार – सुरेश उर्फ भाऊ रांबाडे (बावशी), दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ पत्रकार पुरस्कार – सतिश साळगावकर, शशी तायशेटे उत्कृष्ट
पत्रकार पुरस्कार – तुषार सावंत, अनिल सावंत उत्कृष्ट ग्रामीण
पत्रकार पुरस्कार – उत्तम सावंत, उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार
– अनिकेत उचले, क्रिएटिव्ह रिपोर्टर पुरस्कार – महेश सावंत आदींना
मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरित केले जाणार आहे.
या कार्यक्रमात मराठी पत्रकार परिषदेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड
झाल्याबद्दल गजानन नाईक तसेच सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार
संघाच्या जिल्हाध्यक्षपदी गणेश जेठे, उपाध्यक्ष पदी रमेश
जोगळे व कार्यकारिणी सदस्य पदी श्री. सुधीर राणे यांची निवड
झाल्याबद्दल यांचा विशेष सत्कार होणार आहे. याखेरीज पत्रकार संघाच्यावतीने आयोजित निबंध स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण मान्यवरांच्या हस्ते केले जाणार असल्याची माहिती कणकवली पत्रकार संघाचे अध्यक्ष भगवान लोके आणि सचिव नितीन सावंत यांनी दिली.

15

4