कुपेरीच्या घाटीत मुंबईतील पर्यटकांच्या गाडीचा अपघात…

390
2
Google search engine
Google search engine

कार चालकासह तिघे बचावले ; अपघातात कारचे नुकसान…

मालवण, ता. २४ : मालवणहून कुडाळच्या दिशेने भरधाव वेगाने जाणार्‍या मुंबईतील पर्यटकांच्या कारच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने त्याने ब्रेक लावला. त्यामुळे कार रस्त्यालगतच्या गटारात कलंडून अपघात झाला. या गाडीत चालकासह तिघे पर्यटक होते. सुर्दैवाने ते बचावले. हा अपघात आज सकाळी ११.३० वाजता साळेल नांगरभाट येथील कुपेरी घाटीत घडला.
मुंबईतील पर्यटकांची कार मालवणहून कुडाळच्या दिशेने जात होती. कुपेरीच्या घाटीत भरधाव वेगाने जाणार्‍या कारच्या चालकाचे नियंत्रण सुटले. त्याने ब्रेक लावल्याने गाडी मालवणच्या दिशेने वळून रस्त्यालगतच्या गटारात जावून कलंडली. या पर्यटकांच्या गाडीत चालकासह तीन पर्यटक होते. यात दोन महिलांचा समावेश होता. सुर्दैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. क्रेनच्या साहाय्याने गटारात कलंडलेली कार बाहेर काढण्यात आली. अपघातात कारचे नुकसान झाले आहे.