सी.ई.ओ.राजन रेडकर व ग्रा.प.सदस्य दिलीप गावडे यांच्यासह कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश
वेंगुर्ले.ता,२४: भारतीय जनता पार्टीचा रेडी जि.प.गटाचा कार्यकर्ता मेळावा जल्लोषात साजरा करून शक्तीप्रदर्शन केले. यावेळी भारतीय भ्रष्टाचार निवारण संस्थेचे कोकण विभागाचे सी.ई.ओ.राजन रेडकर आणि शिरोडा ग्रा. प. सदस्य तथा शिरोडा गाव तंटामुक्ती अध्यक्ष दिलीप गावडे यांच्यासह रेडी, शिरोडा भागातील सामाजिक कार्यकर्ते व लोकप्रतिनिधी यांनी भाजपा मध्ये प्रवेश केला. त्यांचे प्रदेश चिटणीस राजन तेली यांनी पक्षात स्वागत केले.
रेडी येथे रेडकर हाॅस्पीटल हाॅल मध्ये भाजपचा जि.प.गट रेडी कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर भाजपा प्रदेश चिटणीस राजन तेली, महाराष्ट्र प्रदेश कार्यालयीन सहसचिव शरद चव्हाण, तालुकाध्यक्ष प्रसन्ना देसाई, शिरोडा सरपंच मनोज उगवेकर, जिल्हा उपाध्यक्ष राजू राऊळ,रेडी जि.प.संपर्क प्रमुख मुंबई सुहास आरोलकर, वेंगुर्ला तालुका महिला आघाडी अध्यक्षा सौ.मनाली करलकर, भाजपच्या शिरोडा ग्रा.पं. सदस्या सौ.समृद्धी धानजी, भाजपा शिरोडा शहर अध्यक्ष लक्ष्मीकांत कर्पे, भाजपा शिरोडा शहर महिला आघाडी अध्यक्षा सौ.संध्या राणे, जिल्हा शेतकरी आघाडी उपाध्यक्ष महादेव शेगले गुरुजी, आरवली ग्राम कमिटी अध्यक्ष विलास रगजी, आरवली महिला आघाडी अध्यक्षा कु.रिमा मेस्त्री, तुकाराम मेस्त्री, प्रतिभा शिरोडकर आदी उपस्थित होते. या वेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाची प्रस्तावना व आभार जिल्हा कार्यकारणी सदस्य अरुण राणे यांनी, मान्यवरांचे स्वागत शिरोडा शहर भाजपा उपाध्यक्ष श्रीकृष्ण धानजी, शिरोडा भाजपा युवा कार्यकर्ते संतोष अणसूरकर, रेडी भाजप पदाधिकारी ओमकार कोनाडकर, जगन्नाथ राणे यांनी केले.
दरम्यान यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत भा.भ्र.नि.संस्था कोकण विभाग सी.ई.ओ.राजन रेडकर यांनी मिलिंद गंवडी, सौरंभ नागोळकर, दयानंद कृष्णाजी, उदय राणे, अशोक हुले, माधव मराठे, किशोर गवंडी, गायत्री मराठे अशा २३ कार्यकर्त्यासह व शिरोडा ग्रा.प. सदस्य तथा शिरोडा तंटामुक्ती अध्यक्ष दिलीप गावडे यांनी अजिक्य गावडे, बबन गावडे, सिध्देश गावडे, दत्तराज गावडे यांच्यासह भाजप मध्ये प्रवेश केला.
*रेडी जि.प.विभागीय अध्यक्ष व उपाध्यक्ष निवड*
या कार्यक्रमावेळी आरवली, शिरोडा, रेडी भाजप पदाधिकारी यांच्या सहमतीने भाजप शिरोडा शहर अध्यक्ष लक्ष्मीकांत कर्पे यांची रेडी जिल्हा परिषद विभागीय अध्यक्ष व उपाध्यक्ष म्हणून आरवली येथील महादेव नाईक व उपाध्यक्ष म्हणून रेडी येथील जगन्नाथ राणे यांची तालुकाध्यक्ष प्रसन्ना देसाई यांनी निवड केली.
तसेच यावेळी मान्यवरांच्या हस्ते शिलाई मशिन प्रशिक्षण घेतलेल्या रेडी येथील २० महिलांना प्रश्स्तीकपत्र वाटप करण्यात आले. यावेळी शिलाई मशिन प्रशिक्षणार्थी तसेच भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.