मुक्तांगणमध्ये गोपाळ काल्यानिमित्त आयोजन
वेंगुर्ले.ता,२४: पुस्तक रुपाने ज्ञानाचा वसा मुलांपर्यंत जावा या हेतूने मुक्तांगणमध्ये गोपाळकाल्याचे औचित्य साधून आज ‘पुस्तक हंडी‘ साजरी करण्यात आली.
मुक्तांगणच्या मुलांनी कृष्ण, कृष्णाचे सवंगडी, नातेवाई आदी वेशभूषा साकारुन पुस्तकरुपी हंडीतून एकमेकांना ज्ञानाचा वसा दिला. मुक्तांगण महिला मंचातर्फे कृष्ण भजनाचा कार्यक्रम करण्यात आला. यात मीरा सावंत, साक्षी वेंगुर्लेकर, प्रियांका मठकर, मयुरी मठकर, स्वाती बांदेकर यांनी कृष्णभजने गाऊन भजनात रंगत आणली. कु. तनिष्का व तनिशा केळुसकर यांपी गौळणी सादर केल्या. कु. माधव ओगले याने कृष्णाचा सवंगडी ‘बोबड्या‘ याची वेशभूषा साकारली. कु. शुभ्रा अंधारीने कृष्ण कथा सांगितल्या. या कार्यक्रमाला मुक्तांगणचे पालक, मुक्तांगण महिला मंचच्या कार्यकर्त्या, माजी विद्यार्थी उपस्थित होते. संचालिका मंगल परुळेकर यांनी पुस्तकहंडीबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुक्तांगणच्या सहशिक्षिका गौरी माईणकर, निलांगी करंगुटकर, गायत्री मिशाळे व प्रिती कोळसुलकर यांनी परिश्रम घेतले. गोपाळ कृष्णाच्या गजरात कार्यक्रमाची सांगता झाली.