पूरग्रस्तांपर्यंत नियोजनबद्ध पोहचविल्या जीवनावश्यक वस्तू
वेंगुर्ले.ता,२४: नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात नागरिकांचे मोठे नुकसान झाले. या आपत्ती ग्रस्तांना मदतीचा हात म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक राज ठाकरे यांनी उत्तर मुंबईमधून पाठवलेल्या जीवनावश्यक वस्तू नियीजनबद्ध रित्या जिल्ह्यात पुरग्रस्तांपर्यंत पोचवण्यात आले. यावेळी वेंगुर्ला तालुका मनसे च्या वतीने तालुकाध्यक्ष विजय सावंत यांच्या हस्ते तुळस येथील आपत्ती ग्रस्तांना ही मदत करण्यात आली. यावेळी कार्यकर्ते गिरिष घोगळे, विठ्ठल तांडेल, दादा ठोंबरे, तात्या सावंत उपस्थित होते.
तुळस येथील पूरग्रस्त कृष्णा परब, मोहन परब, दिगंबर परब, आनंद गोळम, सोमा परब, चंद्रकांत परब, अनिता परब, मंगेश परब, रवींद्र परब, भगवान शिरोडकर, भरती सावंत, गुरुनाथ शेळपकर, निळकंठ सावंत, अनंत पांगम, राजेश पांगम आशा अनेक पूरग्रस्तांना वाटप करण्यात आले. वेंगुर्ला मनसे तालुकाध्यक्ष विजय सावंत यांनी कार्यकर्त्यांसमवेत तुळस गावातील पूरग्रस्त यांच्या घरोघरी जाऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली व राज ठाकरे यांच्या आदेशानुसार आलेल्या सामानाचे घरोघरी जाऊन वाटप केले. जिल्ह्यात आलेल्या सामानाची योग्यरीत्या वाटप जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी योग्यप्रकारे नियोजन करून जिल्ह्यातील पूरग्रस्तांपर्यंत पोचवण्याचे काम केले.