सावंतवाडीत माठेवाडा जिल्हा परिषद शाळेतील चिमुकल्यांनी फोडली दहीहंडी…

2

सावंतवाडी ता.२४:येथील माठेवाडा जि प शाळा नंबर २ मधील महिला व बालकल्याण शहरी विभागाच्या अंगणवाडी क्र.६६ च्या चिमुकल्या मुलाने दहीहंडीचा उत्सव मोठ्या थाटात संपन्न केला.यावेळी श्रीकृष्ण राधा आणि त्याचे सवंगडी होऊन मुलाने दहीहंडी फोडून उत्सव साजरा केला.
यावेळी प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ.खानोलकर सहशिक्षिका सौ.फाले,चैत्राली गवस,राजेश जाधव ,स्नेहा पटेल,सुलोचना पाटील,सुप्रिया केसरकर शिक्षक वर्गासह अंगणवाडी सेविका अनुराधा पवार,मदतनीस अमिषा सासोलकर,शाळा शिक्षक-पालक समितीचे दिया गावडे,पूजा दळवी,पूजा गावडे,साक्षी वैशाली-मिशाळ,अश्विनी पाटील,वासंती परुळेकर आदीसह मुलांसोबत शिक्षक-पालक वर्ग हि मोठ्या संख्येने उपस्थित होता.

4