दीपक केसरकर:शिरशिंगे झोंळंबे तुळसमधील आपदग्रस्तांना स्थलांतरित करणार…
सावंतवाडी.ता,२४: तारकर्लीच्याधर्तीवर आरोंदा-कीरणपाणीसह परिसरात असलेल्या कवठणी कीनळे व सातार्डा या गावांचा विकास करण्यात येणार आहे.खाडीमध्ये बोटिंगची सुविधा उपलब्ध करून पर्यटकांना गावातच राहण्याची सोय उपलब्ध करून दिली जाईल. त्यामुळे भविष्यात या ठिकाणी पर्यटक वाढतील असा विश्वास पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केला.
श्री केसरकर आज जिल्हा दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी येथील आपल्या निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी ते म्हणाले पर्यटनदृष्ट्या खाडी किनार्यावर असलेल्या आरोंदयासह अन्य चार गावांचा विकास केला जाणार आहे. त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान गोव्यातील व्यावसायिकांकडुन मोठ्या प्रमाणात बेकायदा वाळू उत्खनन केले जात असल्यामुळे या चारही गावातील किनारपट्टीचा भाग खचत आहे.त्यामुळे काही घरांसह माडबागायतीला धोका निर्माण झाला आहे.त्यामुळे अशा धोकादायक जागांचे सर्वेक्षण करून त्याठिकाणी संरक्षक भिंती उभारण्यासाठी प्रयत्न केले जातील.
ते पुढे म्हणाले अतिवृष्टीमुळे आपत्ती आलेल्या सावंतवाडीतील शिरशिंगे दोडामार्ग मधील झोळंबे आणि वेंगुर्ले मधील तुळस गावातील आपद्ग्रस्तांना स्थलांतरित करण्यात येणार आहे. तर कुडाळ तालुक्यात सरंबळ या गावात संरक्षक भिंत उभारण्यात येणार आहे. आपद्ग्रस्तांचा सर्वे करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत तसेच त्यासाठी आवश्यक असलेली संरक्षक भिंत बांधण्यासाठी ६० लाख रुपये तात्काळ मंजूर करण्याचे आदेश दिले आहेत. असे केसरकर म्हणाले.