एम.आर.देसाई स्कूलमध्ये मुलांनी पारंपरिक वेशभूषा करून केली दहीहंडी साजरी

2

वेंगुर्ले,ता.२४: वेंगुर्ला येथील बॅ.खर्डेकर महाविद्यालयाच्या प्रि.एम.आर.देसाई इंग्लिश मिडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आज पारंपारिक वेशभूषा परिधान करुन दहीहंडी साजरी केली. या उत्सवात विद्यार्थ्यांनी कृष्ण, राधा, गोपगोपिका, पेंद्या, सवंगडी यांच्या वेशभूषा साकारल्या.

यावेळी बांधण्यात आलेली दहीहंडी बालकृष्णाच्या वेशातील विद्यार्थ्याने फोडून गोकुळाष्टमी साजरी केली. विद्यार्थ्यांना गोकुळाष्टमी व दहीकाल्याची माहिती व्हावी या उद्देशाने हा सण साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. या कार्यक्रमास मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, पालक उपस्थित होते.

4