कणकवली शहरातील रहिवाशांची पूरग्रस्तांना मदत

2

कणकवली,ता.२४: कणकवली शहरातील नाथ पै नगर मित्रमंडळ, सिद्धिविनायक मित्रमंडळ व जळकेवाडी येथील रहिवासी यांनी पूरग्रस्तांसाठी मदत जमा केली. त्याद्वारे धान्याच्या 201 किट्स तयार करून त्याचे तसेच कपडे व अन्य जीवनावश्यक वस्तूंचे वाटप जिल्ह्यातील विविध गावांमधील पूरग्रस्तांना करण्यात आले. या किट्समध्ये तूरडाळ, तेलपिशवी, चहा पावडर, आटा, साखर, मिठपिशवी, दुधपावडर, साबण, टूथपेस्ट, ब्रश, मच्छर अगरबत्ती, सॅनिटरी पड आदींचा समावेश होता. तसेच भांडी, कपडे, चादर, स्वेटर, औषधे, गोळ्या आदींचेही वाटप करण्यात आले. हे वाटप सरंबळ – भटवाडी, बांदा बाजारपेठ, दोडामार्ग तालुक्यातील हेवाळे, केंद्रे, घोटगेवाडी, मुळस आदी गावांमध्ये करण्यात आले. मदतनिधी जमा करणार्‍या ग्रुपमध्ये डॉ.. प्रथमेश सावंत, अजित काणेकर, सुभाष राणे, अमित मयेकर, नीलेश राणे, पराग म्हापसेकर, प्रथमेश परब, योगेश मुंज, मंगेश राणे, सौरभ बरडे, विपुल जुवेकर, संदेश मयेकर, गणेश देवळेकर, स्वप्नील पाटील, ओंकार चव्हाण, मयुरेश तेली, प्रशांत नाईक, भूषण सुद्रिक आदींचा समावेश होता.

20

4