सावंतवाडीत गोविंदांचे थरावर थर…

504
2
Google search engine
Google search engine
Google search engine

नागरिकांची गर्दी:अमेय तेंडोलकर मित्रमंडळाने फोडल्या हंड्या

सावंतवाडी.ता,२४: गोविंदा रे गोपाळा च्या जयघोषात सावंतवाडीकर आणि आज येथे दहीहंडी फोडण्याचा आनंद लुटला. यावेळी येथील तेंडुलकर मित्रमंडळाच्या बालगोपाळांनी शहरातील तब्बल १५ हून दहीहंड्या फोडल्या.हंडी फोडण्याचा थरार पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. यावर्षी पाऊस नसल्यामुळे गर्दीचा महापूर जमला होता.
दरवर्षीप्रमाणे सावंतवाडी शहरात दहीहंडी उत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला. येथील सालईवाडा भागातील पडते यांच्या घरातून श्रीकृष्णाची मूर्ती घेऊन सर्वजण सालईवाडा येथील संस्थानकालीन मुरलीधर मंदिराच्या ठिकाणी दहीहंडी फोडण्यासाठी आले.
त्या ठिकाणी प्रथेप्रमाणे पहिली हंडी अनिकेत आसोलकर या गोपाळा फोडली. तर अस्मी तेंडोलकर या छोट्या मुलीने मानवंदना दीली. त्यानंतर शहरातील हंडी फोडण्यास सुरुवात करण्यात आल्या. तेथून मिलाग्रीस हायस्कूल तिठा, सालईवाडा,बाजारपेठ मित्र मंडळ, मैत्री ग्रुप,चिटणीस नाका मित्र मंडळ, गवळीतिठा आदी हंड्या फोडण्यात आल्या.
रात्री उशिरापर्यंत हा उत्सव सुरू होता यावेळी तेंडुलकर यांच्यासह अरुण घाडी ,मयूर लाखे, फय्याज मुजावर, अमित आसोलकर,रॉजर डिसोजा, विकी लाखे, शुभम मोरजकर, श्रीकृष्ण भोसले,महेश पाटील,संतोष वाघमारे, सागर लाखे, सोहेल शेख, योगेश बेळगावकर, विकी लाखे, वैभव लाखे, किसन धोत्रे, कृष्णा खोरागडे,दिनेश जाधव आदी सहभागी झाले होते.

\