सावंतवाडी.ता,२४: वेंगुर्ले येथील एम.के.गावडे प्रबोधनी यांच्यावतीने बुधवार दि.२८ ऑगस्ट येथील पाटीदार समाज हॉलमध्ये सायंकाळी ७ वा. “दक्षयज्ञ” हा संयुक्त दशावतार नाटयप्रयोग आयोजित करण्यात आला आहे.
या नाटकात दिनेश गोरे (गणपती), पप्पू नांदोस्कर (दक्ष), दत्तप्रसाद शेणई (शंकर), गौरव शिर्के (नारद), उदय कोनसकर (इंद्र), दादा कोनसकर (विरभदर), सुधीर तांडेल (दाक्षायिनी), बाबा मयेकर (भृगुऋषी), नाना प्रभू (नंदी), केशव (विष्णू), शिवा मेस्त्री हे कलाकार भूमिका साकारणार आहेत. संगीतसाथ मयुर गवळी (हार्मोनियम), राजेश आकेरकर (पखवाज), हरेश नेमळेकर (झांज) याची आहे. या नाटकासाठी बाळकृष्ण गोरे दशावतार नाटयमंडळ यांचे सहकार्य लाभले आहे. तरी नाटयरसिकांनी या नाटयप्रयोगाचा लाभ घ्यावा असे आवाहन एम.के.गावडे प्रबोधनी यांनी केले आहे.