गावात जावून दिला धीर:शिरोळ ग्रामस्थांनी मानले मंडळाचे आभार
कोल्हापुर ता 24
शिरोळ येथील पूरग्रस्तांना येथील युवा सिंधू फाऊंडेशनच्या माध्यमातून आज मदतीचा हात देण्यात आला. यावेळी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप त्या ठिकाणी करण्यात आले.याचा लाभ तेथील तब्बल दीडशेहून कुटुंबानी घेतला. याबाबतची माहिती संस्थेचे पदाधिकारी सागर नाणोसकर यांनी दिली. विशेष म्हणजे फक्त पूरग्रस्त भागात गाड्या पाठवून न देता.गावात जाऊन मंडळाच्या पदाधिकारी पूरग्रस्त लोकांना धीर दिला असे त्यांनी सांगितले.
यावेळी गुणाजी गावडे, श्री. योगेश नाईक, मुन्ना आजगावकर, सोनू गवस, विनय वाडकर,ओंकार सावंत तसेच बुबनाळ सरपंच, तंटामुक्त अध्यक्ष, सर्व संस्था, पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते पुरग्रस्थ लोकांची परीस्थिती अत्यंत केविलवाणी आणि हालाखीची आहे