माणगाव-तिठा येथे शिवापूर-सावंतवाडी एसटीला तिहेरी अपघात…

2

बसची समोरून व मागून येणाऱ्या दोन दुचाकींना धडक…

कुडाळ/मिलिंद धुरी ता.२५: शिवापूर-सावंतवाडी या एसटी बसची समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक बसल्या नंतर बिथरलेल्या बसचालकाने बस मागे घेत असताना मागून येणाऱ्या दुसऱ्या दुचाकीला पुन्हा धडक दिली व एकाच वेळी तिहेरी अपघात झाला.ही घटना आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास येथील माणगाव तिठा परिसरात घडली.दरम्यान सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.दीपक हळदणकर(२४) रा.माणगाव व संग्राम घोगळे (३५) रा.वाडोस अशी अपघातग्रस्त दुचाकी चालकांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की अपघात संबंधित एसटी बस शिवापूर येथून सावंतवाडीच्या दिशेने जात होती दरम्यान बस चालकाचा बसवरील ताबा सुटल्यामुळे समोरून येणाऱ्या श्री. हळदणकर यांच्या दुचाकीला बसची जोरदार धडक बसली दरम्यान या अपघातानंतर चालक एसटी मागे घेत असतानाच मागून येणाऱ्या श्री.घोगळे यांच्या दुचाकीला बसच्या मागील बाजून पुन्हा धडक दिली.या अपघाता नंतर घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती.दरम्यान दोन्ही दुचाकींचे मोठे नुकसान न झाल्यामुळे हा विषय समझोत्यातून मिटविण्यात आल्याचे समजते.

2

4