Saturday, November 2, 2024
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यागननबावडा खारेपाटण एसटी बस सुरू करा...

गननबावडा खारेपाटण एसटी बस सुरू करा…

भुईबावडा दशक्रोशितील प्रवाशांची मागणी…

वैभववाडी/पंकज मोरे ता.२५: तीन आठवड्यांपूर्वी झालेल्या जोरदार अतिवृष्टीमुळे भुईबावडा घाटात रस्त्याला मोठमोठया भेगा पडल्या आहेत. या मार्गावरून वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांना ‘नो एंट्री’ आहे. अशा प्रकारचे उंबर्डे व रिंगेवाडी येथे बॕरिकेट्स लावण्यात आले आहेत. मात्र दररोज भुईबावडा घाटातून अवजड वाहनांची वाहतूक सुरू आहे. तसेच गगनबावडा एसटी प्रशासनाने या मार्गावरून एसटी बस न चालविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भुईबावडा दशक्रोशितील प्रवासी व शालेय विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. अवजड वाहने सुरू आहेत. मग एसटी का सुरू नाही? असा सवालही उपस्थित केला जात आहे.
अॉगस्टच्या पहिल्याच आठवड्यात कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात पावसाने हाहाकार माजविला. या प्रलयकारी पावसाचा फटका घाट रस्त्यांना बसला. भुईबावडा घाटात रस्त्याच्या मध्यभागी मोठ्या भेगा पडल्याने वाहनचालकांसह प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ठिकठिकाणी पडझड मोठ्या प्रमाणात झाली आहे.
दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाने उंबर्डे व रिंगेवाडी येथे अवजड वाहनांना बंदी आहे. अशा प्रकारचे बॕरिकेट्स लावले आहेत. मात्र या सूचनेचे अवजड वाहन चालक उल्लंघन करीत आहेत. दररोज भुईबावडा घाटमार्गातून अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू आहे. पंधरा टनाचे जर ट्रक घाटमार्गातून वाहतूक करीत आहेत तर पाच टनाची एसटी बस का सुरू केली जात नाही? असा सवाल प्रवाशांमधून उपस्थित केला जात आहे. गणेश चतुर्थी अवघ्या आठ दिवसांवर येवून ठेपली आहे. मुंबईकर चाकरमानी कमी वेळेत लवकर पोचण्यासाठी कोल्हापूर मार्गाचा अवलंब करतात. तरी गगनबावडा आगाराने गणेश चतुर्थीपूर्वी एसटी बस पूर्ववत करावी अशी मागणी प्रवाशांमधून केली जात आहे.

_भुईबावडा घाट सुरळीत झाल्यावर एसटी बस सोडणार_

यावेळी दूरध्वनीवरून गगनबावडा कंट्रोल रूमशी संपर्क साधला असता, गगनबावडा तहसिलदार यांनी भुईबावडा घाट सुरळीत होत नाही तोपर्यंत एसटी बस सोडू नये. घाटमार्ग सुरळीत झाल्यावर एसटी बस सोडण्यात यावी. असे आदेश दिले असल्याचे त्यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments