महसूल यंत्रणेकडून शेर्लेतील पूरग्रस्तांची हेटाळणी…

2

गुरुदास गवंडे यांचा आरोप ; तात्काळ धान्य द्या, अन्यथा मनसेकडुन आंदोलन….

बांदा ता.२५: शेर्ले येथील पूरग्रस्त लोकांना चतुर्थी सणाच्या पार्श्वभूमीवर गावातील रास्त धान्य दुकानावर धान्य देण्यासाठी बायोमेट्रिकची सक्ती करून ग्रामस्थांना वेठीस धरले जात असल्याचा आरोप मनसेचे तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे यांनी केला आहे.दरम्यान एकीकडे गावात रेंज नाही, तसेच दुसरीकडे पुरपरिस्थितिमुळे ग्रामस्थ हे पूर्ण परिस्थितीमुळे मेटाकुटीला आलेले असतानाच ऑनलाइनची सक्ती का असा प्रश्न त्यांनी केला आहे.याबाबत तहसीलदार कार्यालयाकडुन तात्काळ योग्य ती उपाययोजना करावी,अन्यथा आंदोलन करावे लागेल असा इशारा त्यांनी दिला आहे.
याबाबतची माहिती श्री.गवंडे यांनी दिली.ते म्हणाले भागात मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली होती.अनेक लोकांच्या घरात पाणी गेले होते.त्यामुळे त्यांना शासनाकडून धान्य पुरवठा सुरळीत होणे गरजेचे आहे. परंतु त्याठिकाणी असलेले धान्य दुकानदार ऑनलाइन ते कारण पुढे करून ग्रामस्थांना वेठीस धरत आहे.त्यामुळे धान्य दुकानाच्या समोर लोकांच्या रांगाच रांगा दिसत आहे.
एकीकडे गावात रेंजचा प्रॉब्लेम आहे.संबंधित धान्य दुकानदार अपंग आहे.त्यामुळे धान्य लोकांना देता यावे यासाठी त्या दुकानदाराकडून आवश्यक असलेली यंत्रणा दुकानाच्या आज बाहेर करावी लागत आहे.हा सर्व प्रकार चुकीचा आहे.त्यामुळे याबाबत योग्य तो निर्णय तहसीलदारांनी घ्यावा अन्यथा आपण लोकांसाठी रस्त्यावर उतरू असा इशारा गवंडे यांनी दिला आहे.

10

4