आंबोली घाटातील महिलेच्या खुनाची माहिती देणाऱ्याला बक्षीस…

2

सावंतवाडी पोलिसांकडून तपास:मृत मराठवाडा,सोलापूर,कर्नाटक मधील…?

येथील खोल दरीत आढळून आलेल्या अज्ञात महिलेच्या मृतदेहाच्या तपासासाठी सावंतवाडी पोलिसांनी जोरदार सूत्रे फिरवण्यास सुरुवात केली आहे.या पार्श्वभूमीवर संबंधित महिलेची माहिती देणाऱ्या व्यक्तीला दहा हजार रुपयाचे बक्षीस पोलिसांनी जाहीर केले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,संबंधित महिलेचा खून करण्यात आला होता.तसेच तिचा मृतदेह आंबोली येथील मुख्य दरडीच्या ठिकाणापासून काही अंतरावर असलेल्या सुरक्षा कठड्यावरून खोल दरीत फेकण्यात आला होता.दुसऱ्या दिवशी येथील पोलिसपाटलांच्या जागृकतेमुळे हा प्रकार उघड झाला होता.दरम्यान मृतदेह बाहेर काढण्यास यश आले असले तरी नेमकी संबंधित महिला कोण याचा तपास अद्याप लागलेला नाही त्यामुळे पोलिसांनी या महिलेची माहिती देणाऱ्या खबर्‍याला तब्बल दहा हजार रुपयाचे बक्षीस देण्याचे मान्य केले आहे.तसेच संबंधित महिलेची छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत.
याबाबतची माहिती पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्‍णासो बाबर यांनी दिली.ते म्हणाले संबंधित महिला ही सोलापूर,कर्नाटक किंवा मराठवाडा परिसरातील असण्याची शक्यता आहे.तिच्या अंगावर असलेले दागिने,चप्पल आणि साडीची ठेवण लक्षात घेता तसा अंदाज आम्ही वर्तविला आहे.मात्र संबंधित महिलेने याबाबत अद्याप पर्यंत कोणतेही ठोस पुरावे मिळालेले नाहीत.त्यामुळे याबाबत काही माहिती असल्यास सावंतवाडी पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.

19

4