“राजा” लघुपटाची मुंबईतील महोत्सवासाठी निवड…

269
2

कुडाळ/मिलिंद धुरी ता.२५: नवी मुंबई येथे होणाऱ्या लघुपट महोत्सवात तालुक्यातील गोठोस मधील श्री भावई देवी नाट्यविश्वच्यावतीने तयार करण्यात आलेल्या “राजा” या लघुपटाची निवड करण्यात आली आहे.”देव सेवा प्रतिष्ठान “नवी मुंबई यांच्यावतीने हा लघुपट महोत्सव आयोजित करण्यात आला आहे .हा कार्यक्रम ३१ ऑगस्टला होणार आहे.
कुडाळ तालुक्यातील गोठोस या ग्रामीण भागामध्ये स्थानिक कलाकारांची निर्मिती असलेल्या “राजा” या लघुपटाचे चित्रीकरण झाले.स्थानिक कलाकारांसोबत जिल्ह्यातील अभिनेत्री कल्पना बांदेकर यांनी यात महत्वाची भूमिका साकारली आहे.तर संतोष बांदेकर यांनी लेखन व दिग्दर्शन केले आहे.मुंबईसारख्या या चित्रनगरीत आपल्या मालवणी बोलीत असलेला आणि मालवणी मातीत तयार झालेल्या लघुपटाची निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

4