Monday, April 21, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यावैभववाडी तालुका विकास मंचच्या पदाधिका-यांनी आ. नितेश राणेंची घेतली भेट

वैभववाडी तालुका विकास मंचच्या पदाधिका-यांनी आ. नितेश राणेंची घेतली भेट

तालुक्यातील विकास कामांबाबत दिले निवेदन

वैभववाडी.ता,२५: विकास कामांसाठी नेहमी प्रयत्नशील असणाऱ्या वैभववाडी तालुका विकास मंचच्या पदाधिकाऱ्यांनी आ. नितेश राणे यांची मुंबई येथे भेट घेतली. आ. नितेश राणे यांच्याशी पदाधिकाऱ्यांनी तालुक्यातील समस्या व विकास कामासंबंधी चर्चा केली व निवेदन सादर केले.
यावेळी मंचचे अध्यक्ष चंद्रशेखर सावंत, सचिव सुरेश पाटील, उपाध्यक्ष विठ्ठल तळेकर, कार्याध्यक्ष प्रशांत नारकर, खजिनदार चंद्रकांत रासम, सदस्य योगेश आंब्रसकर, अरुण साळुंखे, योगेश नारकर, चंद्रकांत शिंदे, दीपक कदम, राजाराम शिंदे, स्वप्नील परब आदी उपस्थित होते.
निवेदनातील बहुतांश विकास कामे प्रगतीपथावर आहेत. तर उर्वरित कामे लवकरच मार्गी लागतील. असे आश्वासन आ. नितेश राणे यांनी पदाधिकाऱ्यांना दिले आहे. मागण्यांमध्ये कोकिसरे रेल्वे फाटक अडथळा दूर करणे, रेल्वे प्लॅटफॉर्मवर छप्पर बसविणे, ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचार्‍यांच्या रिक्त जागा त्वरित भरणे, वैभववाडी – उंबर्डे रस्ता डांबरीकरण करणे, नाधवडे बांबरवाडी येथे पूल बांधणे, कुसुर – नापणे रस्ता डांबरीकरण, वैभववाडी – फोंडा रस्ता डांबरीकरण करणे, कुसुर – भुईबावडा रस्ता डांबरीकरण करणे, कोकिसरे नारकरवाडी रस्ता डांबरीकरण करणे, कुसुर कुंभारी ते सोनाळी रस्ता डांबरीकरण करणे, आदी कामांचा समावेश आहे.

फोटो – आ. नितेश राणे यांची वैभववाडी तालुका विकास मंच पदाधिकारी यांनी भेट घेतली. व विकास कामांसंबधी चर्चा केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments