संजय गांधी निराधार बैठकीत १९ प्रकरणांना मंजुरी

139
2
Google search engine
Google search engine
Google search engine

वैभववाडी.ता,२५: वैभववाडी तालुका संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीच्या बैठकीत १९ निराधार लाभार्थ्यांच्या प्रकरणांना मंजुरी देण्यात आली आहे. ही बैठक अध्यक्ष सुहास सावंत यांच्या उपस्थितीत पार पडली.
यावेळी तहसीलदार रामदास झळके, नायब तहसीलदार ए. के. नाईक, संजय गांधी योजना अधिकारी एस. एस. चव्हाण, वरिष्ठ लिपिक श्री बाकडे, समिती सदस्य प्रकाश साखरपेकर, उत्तम सुतार, अशोक रावराणे व अधिकारी उपस्थित होते. मंजूर प्रकरणामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजनेतून १३ प्रकरणे, श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतून ३ प्रकरणे, तर इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेतून ३ प्रकरणांना मंजुरी असे एकूण १९ प्रकरणांना मंजुरी समितीच्यावतीने देण्यात आली आहे.

\