वैभववाडी.ता,२५: नैसर्गिक आपत्तीत संकटात सापडलेल्या कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांना उंबर्डे ग्रामवासियांकडून आर्थिक मदतीचा हात देण्यात आला आहे. वैभववाडी पुरग्रस्त समिती यांच्याकडे पुरग्रस्तांसाठी ३० हजार रूपये इतकी मदत उंबर्डेवासियांनी सुपूर्द केली आहे. यावेळी उंबर्डे सरपंच एस. एम. बोबडे, उपसरपंच दशरथ दळवी, पोलिस पाटील विजय दळवी, उमर रमदूल, अलिबा बोथरे, महमदहसन पाटणकर, रज्जब रमदूल, मंगेश कदम, खंडागळे गुरुजी, रत्नकांत बंदरकर, आबा दळवी, विजय केळकर, रफिक बोबडे व उंबर्डे ग्रामस्थ उपस्थित होते.
तसेच पुरग्रस्त समितीचे मनोज सावंत, गंगाधर केळकर, सचिन रावराणे, विद्याधर सावंत, शारगंधर देसाई, जयवंत पवार व.सदस्य उपस्थित होते. वैभववाडीवासियांनी पुरग्रस्तांना थेट मदत पोहचविण्याचे काम केले आहे. आतापर्यंत दोन टप्यात दोन ट्रक जीवनावश्यक वस्तुंचे वाटप सदस्यांनी पुरग्रस्तांच्या घरी जावून केले आहे. समितीच्या पारदर्शक कारभारामुळे मदतीचा वाढता ओघ सुरू आहे. तिसऱ्या टप्यातील मदतीची पुर्ण तयारी झाली आहे. लवकरच पुरग्रस्त भागात वैभववाडीवासिय जावून मदतीचे वाटप करणार आहेत.
फोटो- पुरग्रस्तांसाठी वैभववाडी पुरग्रस्त समितीकडे मदतीचा धनादेश सुफुर्द करताना उंबर्डे सरपंच श्री बोबडे व ग्रामस्थ.