कर्मयोगी रामभाऊ तुळसकर म्हणजे तुळस गावाचा मानबिंदू…

215
2
Google search engine
Google search engine
Google search engine

डॉ.पी.आर.गावडे;तुळसकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रतिपादन…

वेंगुर्ले.ता,२५: तुळस गावच्या सर्वांगीण विकासात तसेच शैक्षणिक जडणघडणीत ज्यांनी आपल संपुर्ण आयुष्य व्यतित केलं आणि जैतिराश्रीत संस्थेच्या माध्यमातून तुळस गावच्या विकासात आपलं अमूल्य योगदान दिलं ते कर्मयोगी रामभाऊ तुळसकर म्हणजे तुळस गावचा मानबिंदू आहे असे प्रतिपादन डॉ.पी.आर.गावडे यांनी केलं.रामभाऊ तुळसकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित शैक्षणिक मदत आणि पारितोषिक वितरण कार्यक्रमात ते बोलत होते.या कार्यक्रमाची सुरवात रामभाऊ तुळसकर यांच्या पुतळ्यास श्रीफळ ठेऊन आणि पुष्पहार घालून करण्यात आली. या वेळी व्यासपीठावर सरपंच शंकर घारे, उपसरपंच जयवंत तुळसकर,प्रमुख पाहुणे खर्डेकर महाविद्यालय वेंगुर्ले मराठी विभाग प्रमुख डॉ. पी. आर गावडे, उद्योजक दादासाहेब परुळकर,वाचनालय अध्यक्ष सगुण माळकर, जैतिरश्रीत संस्था उपाध्यक्ष विष्णू परब, तुळस हायस्कूल चे मुख्याध्यापक कांबळे,आबा कुडव, प्रकाश परब,मांजरेकर सर,पिंट्या राऊळ,रामू परब आदी मान्यवर उपस्थिती होते. यावेळी शिवाजी हायस्कूल तुळस च्या २४ विध्यार्थ्यांना तुळस श्रीदेव जैतिराश्रीत संस्था मुंबई च्या वतीने शैक्षणिक मदत प्रदान करण्यात आली.यावेळी तुळस5 वाचनालयाच्या वतीने गुणवंत विध्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी बहुसंख्येने पालक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा.सचिन परुळकर यांनी मानले.

\