मसुरेत बिबट्याचा मुक्तसंचार… शेतकऱ्यांसह ग्रामस्थांमध्ये घबराट ; वनविभागाने बंदोबस्त करण्याची मागणी…

289
2
Google search engine
Google search engine
Google search engine

मालवण, ता. २५ : तालुक्यातील मसुरे येथील माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभूगावकर यांच्या घरालगत काल रात्री बिबट्याचा मुक्तसंचार दिसून आला. त्यामुळे परिसरात घबराटीचे वातावरण आहे.
गेले काही दिवस रात्रीच्यावेळी हा बिबट्या गावात फिरत असल्याचे दिसून आले आहे. गावातील अनेक शेतकर्‍यांच्या पाळीव जनावरांचा या बिबट्याने फडशा पाडल्याने शेतकऱ्यांसह, ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण आहे.
काल रात्री नऊ वाजण्याच्या दरम्यान बिबट्या घराच्या परिसरात फिरत असल्याचे समीर प्रभूगावकर यांना दिसला. त्यांच्या मोटारीजवळ तो उभा होता. त्यांनी त्याला तेथून घालविण्याचा प्रयत्न केला. मात्र तो बिबट्या तेथून हलला नाही. अखेर त्यांनी आरडाओरड केली असता तो बिबट्या भरतगड किल्ल्याच्या दिशेने पळून गेला. बिबट्याच्या मुक्त संचाराने ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. त्यामुळे वनविभागाने याची गंभीर दखल घेत बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

\