कणकवली, ता.२५ : कणकवली तालुका पत्रकार समितीच्यावतीने आयोजित शालेय व खुल्या गटातील निबंध स्पर्धेचा निकाल जाहिर करण्यात आला आहे. खुल्या गटात भिरवंडे येथील किरण मोतीराम सावंत यांनी तर शालेय गटात विद्यामंदिर हायस्कूल, कणकवलीच्या सिद्धी सुरेंद्र मोरे हिने प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. यशस्वी विद्यार्थ्यांना बुधवार २८ ऑगस्ट रोजी सकाळी १० वा. कणकवली कॉलेजच्या एचपीसीएल सभागृहात होणाऱया कार्यक्रमात पारितोषीक देऊन गौरविण्यात येणार आहे.
कणकवली पत्रकार समितीच्यावतीने आठवी ते दहावी आणि खुल्या गटात निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. स्पर्धेचा उर्वरित निकाल पुढीलप्रमाणे : खुला गट – २. सौ. सुरेखा शामसुंदर परब, ओसरगाव, ३. हेमंत मोतीराम पाटकर, कणकवली, उत्तेजनार्थ – प्रतिक्षा भगवान तेली, फोंडाघाट कॉलेज.
शालेय गट – २.समीक्षा सतीश कामत, ३.भक्ती शंकर राठोड (दोन्ही vयू इंiलीश स्कूल, फोंडाघाट), उत्तेजनार्थ – हृतिका रविकांत पेंडूरकर (माध्यमिक विद्यालय, कनेडी).
स्पर्धेचे परीक्षण पत्रकार वीरेंद्र चिंदरकर, माणीक सावंत व शिक्षिका निकिता बगळे यानी केले. यशस्वी स्पर्धकांना स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र व रोख बक्षिस देऊन गौरविण्यात येणार आहे. यशस्वी स्पर्धकांनी बक्षिस समारंभाला वेळीच उपस्थित रहावे, असे आवाहन कणकवली तालुका पत्रकार समितीचे अध्यक्ष भगवान लोके , सचिव नितीन सावंत यानी केले आहे.