जानवलीतील अपघातात वैभवववाडीतील शिक्षकाचा मृत्यू

2

कणकवली, ता.२५:मुंबई गोवा महामार्गावरील जानवली रतांबे व्हाळ येथील झालेल्या अपघातात वैभववाडी-नाधवडे येथील प्राथमिक शिक्षक प्रवीण विनायक खाडये (वय 32) यांच्यासह दयानंद सावळाराम सुतार (वय 26, रा.उंबर्डे, ता.वैभववाडी) याचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तर मोटारसायकलच्या मागे बसलेले शिवराम बापू शेटये (वय 75) गंभीर हे जखमी झाले असून त्याच्यावर कणकवलीतील खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
जानवली रतांबे व्हाळ येथे सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास दोन मोटारसायकल एकमेकांना समोरासमोर धडकून हा अपघात झाला होता. यात प्रवीण खाडये हे आपले सासरे शिवराम शेटये यांना घेऊन कणकवलीत येत होते. तर दयानंद सुतार हा कणकवलीतून उंबर्डे येथे जात होता. जानवली रतांबे व्हाळ येथे या दोहोंच्या मोटारसायकल एकमेकांना धडकल्या. यात सुतार हा महामार्गालगतच्या ओहोळात जाऊन पडला आणि तेथेच गतप्राण झाला. तर प्रवीण खाडये हे थेट महामार्गावर आदळले. यात त्यांच्या डोकीला गंभीर दुखापत झाली. तसेच प्रचंड रक्तस्राव झाल्याने ते जागीच मयत झाले. या अपघातात खाडे यांचे सासरे शिवमराम बापू शेटये हे देखील महामार्गालगत कोसळले. त्यांच्यावर कणकवलीतील खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. दयानंद सुतार हा उंबर्डे वैभववाडी इलेक्ट्रॉनिक दुकानात कामाला होता. एक वर्ष त्याने 108 रूग्णवाहिकेवर चालक म्हणून काम केले होते.

15

4