एकेरी वाहतूक; बांधकामचे अधिकारी देसाई यांनी शब्द पाळला…
आंबोली ता.२५:*गेले पंधरा ते सोळा दिवस बंद असलेला आंबोली घाट अखेर उद्यापासून एसटी वाहतुकीसाठी सुरू होणार आहे त्यासाठी आवश्यक असलेले पत्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने एसटी प्रशासनाला देण्यात आले आहे.त्यामुळे एसटीसाठी उद्या घाट सुरू होणार असून सायंकाळी ७ :०० पर्यंत ही वाहतूक सुरु राहणार आहे. दोन दिवसात घाट सुरुु करू असा बांधकामचे कार्यकारीी अभियंता युवराज देसाई यांनीी शब्द दिला होता.
गेल्या पंधरा दिवसापूर्वी झालेल्या मुसळधार पावसात आंबोली घाटातील काही दर्डी कोसळल्या होत्या.त्यात मुख्यत्वेकरून मुख्य धबधब्याच्या समोरची दरड कोसळल्यामुळे एका बाजूने रस्ता खचला होता.दरम्यान तो तात्काळ दुरुस्ती करणे शक्य नसल्यामुळे घाट गेले चौदा ते पंधरा दिवस बंद होता.त्यामुळे दोन्ही बाजूने होणारी अवजड वाहतूक थांबली होती.परिणामी परिसरातील हॉटेल व्यवसायिक यांचा धंदा मंदावला होता.यावेळी तात्काळ हा घाट सुरू करण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थ व व्यापाऱ्यांकडून करण्यात आली होती.घाटाची पाहणी करण्यासाठी गेलेल्या पालकमंत्री दीपक केसरकर यांनी घाट तात्काळ सुरू करण्यासंदर्भात प्रयत्न करू असे आश्वासन दिले होते.त्यानुसार युद्धपातळीवर काम करण्यात आले आहे.उद्यापासून एकेरी मार्ग सुरू करण्यात येणार आहे.
डोंगराकडचा काही भाग सरळ करून हा रस्ता सुरू करण्यात आला आहे विशेष करून एसटी प्रशासनाला तसे पत्र देण्यात आले आहे त्यामुळे उद्यापासून घाट सुरू होईल अशी अपेक्षा आहे.