जिल्ह्यातील कृषिपंपांना विद्युत पुरवठा मिळणार…

2

दीपक केसरकर; पंधरा दिवसात कार्यवाही करण्याची विजमंत्र्यांची हमी…

सावंतवाडी ता.२५: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कृषिपंपांना आता विद्युत पुरवठा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.त्यासाठी आवश्यक असलेली तीन कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.याबाबतची माहिती पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.दरम्यान येत्या पंधरा दिवसात कृषी पंपांना वीजपुरवठा देण्यात येईल असे त्यांनी सांगितले.
जिल्ह्यातील कृषिपंपांना विद्युत पुरवठा करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून तीन कोटी ५० लाख रुपयांची तरतूद केली आहे .कृषी पंपांना वीज पुरवठा करण्याची प्रक्रिया राबविण्यात आली होती.मात्र हाय होल्टेज डिस्ट्रीब्यूशन सिस्टीम ही प्रणाली लागू करण्यात आल्याने पारंपरिक प्रणाली मध्ये काम करून घेण्यासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या.परंतु या प्रक्रियेला ठेकेदाराकडून प्रतिसाद मिळाला नव्हता.परिणामी जिल्ह्यातील कृषिपंपांना विद्युत पुरवठा होऊ शकला नाही.त्यामुळे श्री.केसरकर यांनी विज मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी संपर्क साधून हा प्रश्न मार्गी लावला आहे.

4