दर्शन नाईक मित्र मंडळाच्या वतीने आयोजन…
कुडाळ/मिलिंद धुरी ता.२५: माणगाव येथील कै.दर्शन नाईक मित्र मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेला आज पासून सुरुवात करण्यात आली.यात तब्बल २० संघांनी सहभाग दर्शवला.या स्पर्धेचे उद्घाटन शिवसेना युवा सेना उपजिल्हाप्रमुख योगेश धुरी यांच्या हस्ते करण्यात आले.
गेली तेरा वर्षे मंडळाच्या वतीने ही स्पर्धा भरवली जात आहे.दरम्यान यावर्षी भरविण्यात आलेली ही स्पर्धा २५ ते २६ ऑगस्ट या कालावधीत श्री.वासुदेवानंद सरस्वती विद्यालयाच्या पटांगणावर खेळविण्यात येणार आहे.या स्पर्धेत राष्ट्रीय खेळाडू म्हणून योगेश गावडे,यतिन धुरी,सचिन सावंत,निलेश वारंग,सिद्धेश मुंज,ओमकार शेडगे,भिवा महाडेश्वर यांची निवड करण्यात आली.