वीज कनेक्शन तोडलेले जिल्ह्यातील मोबाईल टाॅवर पुन्हा सुरू

2

 

वीजमंत्र्याचे आदेश:पालकमंत्री व खासदारांच्या पाठपुराव्यानंतर कार्यवाही

कणकवली
मोबाइल ग्राहकांचे नुकसान होऊ यासाठी अधिका-यांना पूर्वकल्पना न देता, बीएसएनएलचे वीज कनेक्शन तोडू नये असे सक्त आदेश विजमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी वीज वितरणच्या अधिकाऱ्यांनी दिले.त्यामुळे सकाळी बंद पडलेले जिल्ह्यातील काही टाॅवर पुन्हा सुरू झाले आहेत.
थकीत बिलांचे कारण पुढे करून जिल्ह्यातील काही मोबाईल टॉवरचे वीज कनेक्शन आज अचानक तोडण्यात आले होते.त्यामुळे जिल्ह्यातील अनेक गावात मोबाईल टाॅवर बंद होते. याबाबत संबंधित गावातील लोकांनी खासदार विनायक राऊत यांच्याशी संपर्क साधून याबाबतची माहिती दिली.
यात लोकांचे व ग्राहकांची नुकसान होऊ नये म्हणून तात्काळ हे टॉवर सुरू करण्यात यावेत अशी मागणी करण्यात आली होती. यावेळी खासदार राऊत यांनी हा प्रकार पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या कानावर घातला. त्यांनी तात्काळ विजमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी संपर्क साधून वीज पुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना दिल्या. कोणतीही कल्पना न देता वीजपुरवठा खंडित करू नये असे आदेश दिले याबाबतची माहिती पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली त्यासाठी खासदार राऊत यांनी पाठपुरावा केला असे त्यांनी सांगितले

4