मायलेक नृत्य स्पर्धेत सिद्धी – श्रीया माणगावकर मायलेकी विजेत्या…शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त स्पर्धेचे आयोजन…

2

मालवण, ता. २५ : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तालुका शिवसेना व महिला पदाधिकार्‍यांच्यावतीने घेतलेल्या मायलेक नृत्य स्पर्धेत सिद्धी माणगावकर-श्रीया माणगावकर या मायलेकींनी प्रथम क्रमांक पटकाविला. केतकी सावजी-कृतिका सावजी, यशश्री मोरजकर-राधीका मोरजकर या मायलेकींनी अनुक्रमे द्वीतीय, तृतीय क्रमांक मिळविला.
शहरातील दैवज्ञभवन येथे घेण्यात आलेल्या या स्पर्धेस मालवणवासियांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. स्पर्धेचे उद्घाटन शिवसेनेच्या मुंबईतील ज्येष्ठ महिला पदाधिकारी सुचित्रा चिंदरकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, जिल्हा महिला आघाडीप्रमुख जान्हवी सावंत, दीपा शिंदे, संतोष गावडे, नगरसेविका सेजल परब, सुनीता जाधव, नंदा सारंग, आकांक्षा शिरपुटे, अंजना सामंत, तृप्ती मयेकर, श्वेता सावंत, नीलम शिंदे, गणेश कुडाळकर, विद्या फर्नांडिस, प्रियांका रेवंडकर, मानसी परुळेकर, रश्मी परुळेकर, अनुष्का गावकर, पूजा तळाशीलकर यांच्यासह परीक्षक चेतन हडकर, गार्गी ओरसकर आदी उपस्थित होते.
कार्यक्रमात हरी खोबरेकर, जान्हवी सावंत, सुचित्रा चिंदरकर यांनी मनोगते व्यक्त केली. स्पर्धेत शहरातील मायलेकींनी सादर केलेल्या विविध नृत्याविष्काराला रसिकांनी भरभरून दाद दिली. स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषिके, चषक तसेच भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. सूत्रसंचालन करून नीलम शिंदे यांनी आभार मानले.

1

4