Friday, December 13, 2024
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यासागरी अतिक्रमणग्रस्त देवबागवासीयांना जीवनावश्यक वस्तूचे वाटप... वंचित कुटुंबीयांनाही मदत दिली जाणार...

सागरी अतिक्रमणग्रस्त देवबागवासीयांना जीवनावश्यक वस्तूचे वाटप… वंचित कुटुंबीयांनाही मदत दिली जाणार ; हरी खोबरेकर…

मालवण, ता. २५ : देवबाग येथील पूरग्रस्त व सागरी अतिक्रमण बाधित कुटुंबीयांना शिवसेना डोंबिवली शहर महिला आघाडी व स्थानिक पदाधिकारी यांच्यावतीने आज जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार राज्यातील पूरग्रस्त भागात मदतीचे वाटप शिवसेनेच्या माध्यमातून सुरू आहे. त्याच धर्तीवर मालवण देवबाग येथेही सुमारे ३५० जणांना अन्नधान्यासह १६ जीवनावश्यक वस्तू व महिलांना साड्या असे वाटप झाले. यावेळी डोंबिवली महिला आघाडी शहर संघटक किरण मोंडकर, उपशहर संघटक सीमा अय्यर, विभागप्रमुख प्रतिमा शिरोडकर, शाखा प्रमुख संजय मांजरेकर, उपशहर संघटक गुलाब म्हात्रे, शाखा संघटक संध्या शिर्के, प्रतिमा नारखेडे, सानिका खाडे यासह तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, आरोग्य सभापती पंकज सादये, पंचायत समिती सदस्य मधुरा चोपडेकर, उपसरपंच तमास फर्नांडिस, अनिल केळुसकर, रमेश कद्रेकर, फिलसू फर्नांडिस, मकरंद चोपडेकर, महेश शिरपुटे, अक्षय रेवंडकर व अन्य शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.
पूर व आपत्तीत अनेकांचे नुकसान झाले. शिवसेनेसोबत युती शासनाच्या माध्यमातूनही मदत उपलब्ध केली जात आहे. देवबाग येथे ३५० जणांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. मात्र काहीजणांना ही मदत मिळाली नाही. अशा कुटुंबाना चार दिवसात आमदार वैभव नाईक व तालुका शिवसेनेच्या माध्यमातून मदत दिली जाईल असे हरी खोबरेकर यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments