निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांकडे दिला दहा हजारांचा धनादेश
सिंधुदुर्गनगरी.ता,२६: मालवण तालुक्यातील मसुरे देऊळवाडा जिल्हा परिषद शाळेच्या मुलांनी मानुसकिचा धर्म राखत विविध उपक्रमातून जमा केलेला दहा हजार रुपयांचा निधी महाराष्ट्रातील पुराग्रस्तांसाठी दान केला. मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी हा धनादेश सोमवारी निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांच्याकडे सुपुर्द करीत आपल्यापरीने पुरग्रस्त व्यक्तींसाठी मदतीचा हात पुढे केला आहे.
पुरग्रस्त व्यक्तींना मदत करण्यासाठी मसुरे देऊळवाडा शाळेने विशेष उपक्रम राबविले. त्याकरिता मुलांनी राखी बनवून त्या रक्षाबंधन निमित्त विकल्या. ग्रामस्थांकडून मदतनिधी गोळा केला. तसेच दहिहंडी खेळली. यातून दहा हजार रूपये एवढा निधी संकलन केला. या रक्कमेचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी निवासी उपजिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केला. यासाठी मुलांना शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभलेच. त्याचबरोबर पालक, शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामस्थ व शिक्षक यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
निवासी उपजिल्हाधिकारी सौ साठे यांच्याजवळ सोमवारी मसुरे देऊळवाडा प्रशालेच्या शालेय स्वराज्य सभेचे मुख्यमंत्री तथा विद्यार्थी दत्तराज उत्तम घाडीगावकर, तसेच शुभम मेस्त्री यांनी दहा हजार रुपयांचा धनादेश सुपुर्द केला. यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक प्रशांत पारकर, शिक्षक सचिन डोळस, स्वाती कोपरकर उपस्थित होते.