नगराध्यक्ष साळगावकर; सावंतवाडीत सुरू असलेल्या प्रशिक्षण कार्यशाळेला भेट…
सावंतवाडी ता.२६: भारत सरकारच्या कौशल्य विकास उपक्रमांचा महिला सक्षमीकरणासाठी मोठा फायदा होणार आहे.या माध्यमातून सामान्य महिलांना स्वयंरोजगार मिळण्यास नक्कीच मदत होईल,असा विश्वास नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी याज येथे व्यक्त केला.शहरातील समाज मंदीर बहुउद्देशीय प्रशिक्षण व सुविधा केंद्रात महिलांसाठी सुरू असलेल्या “फुटवेअर डिझाइन अँड डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट” या मोफत प्रशिक्षण कार्यशाळेला नगराध्यक्ष श्री.साळगावकर यांनी आज पालिका पदाधिकाऱ्यांसह भेट देऊन पाहणी केली यावेळी ते बोलत होते.
साळगावकर म्हणाले,
महिला सक्षमीकरणासाठी सरकार कडून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचा महीलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यास फायदा होणार आहे. याचे श्रेय हे केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांनाच द्यायला हवे.
या मोफत प्रशिक्षण कार्यशाळेत महिलांना लेदर गारमेंटस,गुड्स आणि फुटवेअर,शिलाई व कटिंग प्रशिक्षण दिले जात आहे.या एका महिन्याच्या प्रशिक्षण वर्गात महिलांना लेदर आणि रेक्झिन पासून बनविण्यात येणारे वॉलेट,पर्स तसेच सर्व प्रकारच्या बॅग्ज तयार करण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे.आतापर्यंत या प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून ६० महिलांनी प्रशिक्षण घेतले आहे.तर १२० महिलाना सद्यस्थितीत प्रशिक्षण दिले जात असल्याची माहीती केंद्र चालक संदिप देसाई यांनी दिली.
यावेळी उपनगराध्यक्ष अन्नपूर्णाछ कोरगावकर,नगरसेवक सुरेंद्र बांदेकर,शुभांगी सुकी,आनंद नेवगी, याच्यासह प्रियांका सुकाळे,विकास सविता आदींसह मोठ्या संख्येने प्रशिक्षणार्थी महिला उपस्थित होत्या