महाराष्ट्र स्वाभिमानची मागणी:बॅकेच्या अधिका-यांना घेराव
बांदा.ता,२६:
बांदा शहरातील सिंधुदुर्ग जिल्हा बँक वगळता इतर सर्व राष्ट्रीयकृत बँकांची एटीएम गेली कित्येक दिवस बंद असल्याने महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे शहर अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य जावेद खतीब यांनी बँक आँफ इंडियाच्या शाखेत धडक देत शाखा व्यवस्थापक दुर्वेश नारायण यांना जाब विचारला. महापुराच्या पाण्यात एटीएम मशीन बुडल्याने बंद असल्याचे उत्तर बँकेने दिले. गणेश चतुर्थी कालावधीत एटीएम सुरू न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा यावेळी खतीब यांनी दिला आहे.
यावेळी स्वाभिमान पक्षाचे साई धारगळकर, अक्षय परब, श्रीधर मोर्ये, गणेश म्हाडगूत, भाई म्हाडगूत आदी उपस्थित होते.