सावंतवाडी ता.२६: येथील संस्थांच्या इतिहासकालीन श्री देव पाटेकर देवघरातील श्रावण मास समाप्ती सोहळा आज राेजी राजवाडा येथे संपन्न झाला.संस्थानच्या राजमाता श्रीमंत सत्वशिला देवी भोसले यांच्या कृपाशीर्वादाने मागील सात वर्ष प्रसाद सोहळा संपन्न झाला आहे.असे माजी आमदार शिवराम दळवी यांनी यावेळी बोलताना सांगितले.
संस्थांचे राजेसाहेब श्रीमंत खेमसावंत भोसले व श्रीमंत शुभदा देवी भोसले यांच्या आदेशाने श्रावण मास दिवशी सोमवारी सकाळी देवदर्शन व सकाळी अकरा वाजल्यापासून महाप्रसाद ठेवण्यात आला हाेता.श्री देव पाटेकर मंदिरात श्री.राजपुरोहित व श्री.काेंळबेकर गुरुजींनी पूजा केली.
राजघराण्याने पूजा केल्यानंतर भक्तांनी दर्शन घेतले माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले ,माजी आमदार शिवराम दळवी तसेच अनेक मान्यवरांनी आज श्री.देव पाटेकर चरणी लीन होऊन महाप्रसादाचा लाभ घेतला .
या महाप्रसादाचे आयोजक शिवराम दळवी म्हणाले,राजमातांच्या आशीर्वादाने मागील सात वर्षांपासून श्री.देव पाटेकर मंदीरात श्रावणातील शेवटच्या सोमवारी महाप्रसाद दिला जात आहे.श्री.देव पाटेकर राजघराण्याचे दैवत असले तरी ते संस्थांचे दैवत मानून संस्थांनच्या सर्व मानकऱ्यांना आणि देवाच्या भक्तांना येथे आमंत्रित करण्यात आले आहे .सर्व भक्त महाप्रसादाचा लाभ घेत आहेत असे शिवराम दळवी म्हणाले .
यावेळी बाळू परब, रेमी अल्मेडा यांनी आयोजनामध्ये सक्रिय सहभाग घेतला शिवराम दळवी व सुपुत्र मंदार दळवी यांनी देखील उपस्थित भक्तांना महाप्रसाद मिळावा म्हणून उपस्थित राहून सर्वांना उपकृत केले.