Tuesday, December 10, 2024
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याअन्यथा ....पालकमंत्री केसरकरांना खेळण्यातलं विमान कुरियर करणार...

अन्यथा ….पालकमंत्री केसरकरांना खेळण्यातलं विमान कुरियर करणार…

परशुराम उपरकर:आम्ही दिशाभूल केली नाही,तर युवकांना प्रत्यक्षात रोजगार दिला…

सावंतवाडी ता.२६: चिपी विमानतळावर गेल्यावर्षी ऐन चतुर्थीत गणपती उतरून लोकांची दिशाभूल करणारे पालकमंत्री दीपक केसरकर एक वर्षानंतर जिल्ह्यात विमान उतरविण्यास सपशेल अपयशी ठरले आहेत.त्यामुळे त्यांनी जर चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी विमान उतरले नाही तर आम्ही खेळण्यातले विमान त्यांना कुरिअर करून भेट देणार,अशी टीका मनसेचे नेते तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केली.
जिल्ह्याच्या विकासाच्या गप्पा मारणाऱ्या केसरकरांनी येथील बेरोजगारांना केवळ रोजगार देऊ असे सांगून दिशाभूल केली.मात्र मनसेने प्रत्यक्षात ३२ कंपन्यांचा मेळावा घेऊन याठिकाणी साडेचारशे हून अधिक युवकांना रोजगार उपलब्ध करून दिला.त्यातील अनेक युवकांना चार ते पाच कंपन्यांनी ऑफर लेटर दिली आहेत.त्यामुळे कोणाकडे जायचे हे त्यांच्या हातात आहे.असेही त्यांनी सांगितले.
श्री.उपरकर म्हणाले दिशाभूल करणाऱ्या केसरकरांसह चिपी विमानतळ प्रशासनाला जाब विचारण्यासाठी मी व राष्ट्रवादीचे माजी आमदार किरण पावसकर उद्या चिपी विमानतळावर जाणार आहोत.राष्ट्रवादी व मनसेकडून केसरकर यांना जाब विचारण्यात येणार आहे.
यावेळी विठ्ठल गावडे,आशिष सुभेदार,अतुल केसरकर,कुणाल किनळेकर,राजू कासकर आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments