नितेश राणे:कणकवली तालुका परीक्षा समितीच्यावतीने विद्यार्थ्यांचा सत्कार
कणकवली, ता.२६ : जिल्ह्यातील प्राथमिक शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी अभ्यासासाठी इस्त्रोपर्यंत गेले ही घटना सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी भूषणावह आहे. जागतिक पातळीवर जिल्ह्याचे नावलौकिक वाढविणारी आहे. काळानुरूप शिक्षैणिक बदल आवश्यक आहेत. शैक्षणिक विकासासाठी आणि शिक्षणाचा दर्जा उंचविण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य मी करणार आहे. तुम्हा जनतेच्या आशीर्वादाने पुन्हा आमदार झाल्यानंतर विधीमंडळाच्या माध्यमातुन अपेक्षित शैक्षणिक बदल घडवुन आणण्यासाठी मी प्रयत्न करेन असा विश्वास आ. नितेश राणे यांनी व्यक्त केला.
कणकवली परीक्षा समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आ. नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी कला, क्रीडा, ज्ञानी मी होणार, डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम टॅलेंट सर्च इतर शिष्यवृत्ती परिक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा भेट वस्तु, शैक्षणिक साहित्य देवुन सात्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संजना सावंत, सभापती सुजाता हळदिवे, उपसभापती सुचिता दळवी, माजी सभापती भाग्यलक्ष्मी साटम, पं.स.सदस्य प्रकाश पारकर, मनोज रावराणे, हर्षदा वाळके, दिलीप तळेकर, मिलिंद मेस्त्री, मनोज भोसले, कलमठ ग्रा.प. सदस्य कलमठचे युवक अध्यक्ष संदिप मेस्त्री, गटशिक्षणाधिकारी किंजवडेकर यांच्यासह परिक्षा समितीचे सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते.
आ.नितेश राणे म्हणाले, विद्यार्थ्यांच्या गुणांचा सत्कार झाला याचे आम्हाला जसे समाधान वाटले त्याप्रमाणे समाधान आणि उत्साह विद्यार्थ्यांच्या चेहºयावर पाहिला मिळाला. या सत्कारातून पुढील आयुष्यात सातत्याने यश मिळविण्याची स्फूर्ती विद्यार्थ्यांना मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शाळेत अनेक मुले जातात. मात्र, सत्कार काही ठराविकच मुलांचा होतो. उर्वरित मुलांनी या सत्कारातून आपणही असेच गुणवंत बनावे याचा संकल्प करावा. इस्त्रो च्या दौºयावर गेलेल्या मुलांचे अनुभव ऐकल्यानंतर समाधान वाटते अशा पद्धतीचे विद्यार्थ्यांचे दौरे जिल्हा परिषद आणि पं.स. स्तरावर घेऊन प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. मुलांच्या ज्ञानाची भुक क्षमविण्याची जबाबदारी आपली आहे. मी बहुतांश: शाळा डिजिटल केल्या. आज या शाळांचा अहवाल घेता डिजिटल मुळे विद्यार्थ्यांना शाळेत जावेसे वाटते आणि शिक्षकांना नव्या वातावरणात नवे शिक्षण देण्याचा आनंद मिळत आहे. कणकवली सारख्या शहरात सीबीएससी बोर्ड चे शिक्षण जे कोल्हापुर, पुणे येथे जाऊन जिल्ह्यातील मुलांना घ्यावे लागते ते उपलब्ध करून देत आहोत तर ग्रामीण भागात डिजिटल शाळांच्या माध्यमातून व अन्य शैक्षणिक सुविधा पुरवुन दर्जेदार शिक्षण देत राहणार असेही आ. नितेश राणे यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष सौ. संजना सावंत म्हणाल्या, जिल्हा परिषदेच्या शाळांमधुन डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम शिष्यवृत्ती परिक्षेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांशी बोलल्यानंतर इंग्रजी माध्यमांच्या विद्यार्थ्यांनाही मागे टाकतील अशी हुशारी जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये दिसते असे त्या म्हणाल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटशिक्षणाधिकाºयांनी केले तर सुत्रसंचलन राजेश कदम यांनी केले.
चौकट: जिल्हा परिषद शाळेमुळेच आम्हाला इस्त्रो अभ्यास दौरा घडला
अभ्यास सहलीसाठी इस्त्रोला गेलेल्या कणकवली तालुक्यातील अथर्व शिरसाट आणि राज सावंत यांनी आपले अनुभव कथन केले. जिल्हा परिषदेच्या शाळेमुळेच आम्हाला ही संधी मिळाली. आजपर्यंत टीव्हीमध्ये आणि चित्रात विमान पाहिले होते. प्रत्यक्ष त्यातुन प्रवास करण्याचा आनंद मिळाला. यान कसे सोडले जाते. इस्त्रोमध्ये कशापद्धतीने कामकाज केले जाते हे जवळून अनुभवता आले. आमच्या आयुष्यातील ही अभ्यास सहल कधी न विसरणारी आणि प्रेरणा देणारी आहे असे कु. अथर्व आणि कु. राज यांनी सांगितले.
फोटो कॅप्शन : विद्यार्थ्यांचा गुणगौरव करताना आ. नितेश राणे