आप्पासाहेब पटवर्धनांचा पुतळा कणकवलीत उभारणार…

176
2
Google search engine
Google search engine
Google search engine

समीर नलावडे:आमदार नितेश राणे यांच्या सहकार्याने २९ ला मिळणार पुतळा…

कणकवली ता.२६: येथील नगरपंचायतच्या प्लेग्राऊंड गार्डन भालचंद्र महाराज आश्रमानजीक कोकण गांधी आप्पासाहेब पटवर्धन यांचा पुर्णाकृती पुतळा बसविण्यात येणार आहे़.त्यासाठी आमदार नितेश राणे यांच्या पुढाकाराने आप्पासाहेब यांचा साडेपाच फुट उंचीचा पुतळा,२९ आॅगस्ट रोजी दुपारी १२ वाजता आ़ नितेश राणे यांच्या हस्ते कणकवली मुख्याधिकाऱ्यांकडे सुपुर्द करण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली़.
कणकवली येथे पत्रकारांशी संवाद त्यांनी साधला़ यावेळी बांधकाम सभापती संजय कामतेकर उपस्थित होते़.कणकवलीचे महान कर्मयोगी अप्पासाहेब पटवर्धनांची प्रेरणा पुढील पिढ्यांपर्यंत जतन राहण्यासाठी त्यांच्या पुणार्कृती पुतळ्याची संकल्पना व नियोजन आ़.नितेश राणे यांनी केले आहे.तब्बल ६ फूट ६ इंच उंचीचा अप्पासाहेबांचा पुणार्कृती पुतळा कस्बा डिझाईन्स प्रा. लिमिटेड या कलासंस्थेच्या माध्यमातून कल्याणमधील प्रसिद्ध व्यक्तीशिल्पकार जयदिप आपटे यांच्याकडून घडवण्यात आला आहे. कणकवलीचा ऐतिहासिक वारसा जपणारा हा पुतळा कणकवली नगरीला हस्तांतरीत करण्याचा समर्पण सोहळा २९ आॅगस्ट २०१९ रोजी कणकवली येथे आयोजित करण्यात आला आहे.सदर पुतळ्याचे कणकवली नगरपरिषदेच्या नव्याने येऊ घातलेल्या प्रकल्पांतर्गत,सर्व शासकीय नियमांची पुर्तता करून जिल्हाधिकाºयांच्या परवानगीने लवकरच लोकार्पणही करण्यात येईल,असे नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी सांगितले.

\