Tuesday, December 10, 2024
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याविरोधकांनी टीका करीत बसण्यापेक्षा कामे करा

विरोधकांनी टीका करीत बसण्यापेक्षा कामे करा

आ. नितेश राणे; वैभववाडी बसस्थानक परिसराची डागडुजी, खडीकरण व सुशोभिकरण लोकार्पण सोहळा

वैभववाडी.ता,२६: वैभववाडी बसस्थानकाची अत्यंत दयनिय अवस्था झाली होती. पावसाळ्यात याठिकाणी चालणेही मुश्किल बनले होते. जनतेला होणारी गैरसोय तात्काळ दूर व्हावी यासाठीच आम्ही जनतेच्या जिव्हाळ्याचा प्रश्न हाती घेतला. विरोधकांनी टीका करीत बसण्यापेक्षा आम्ही करतो तशी कामे करा. असा सल्ला आ. नितेश राणे यांनी दिला.
वैभववाडी बसस्थानक परिसराची डागडुजी, खडीकरण व सुशोभिकरणाचे काम आ. नितेश राणे यांनी स्वखर्चातून मार्गी लावले आहे. सदर बसस्थानक कामाचा लोकार्पण सोहळा आ. नितेश राणे यांच्या हस्ते सोमवारी दुपारी पार पडला.
यावेळी स्वाभिमान अध्यक्ष अरविंद रावराणे, नगराध्यक्षा दिपा गजोबार, जिल्हा प्रवक्ते भालचंद्र साठे, माजी सभापती दिलीप रावराणे, उपनगराध्यक्ष रोहन रावराणे, बँक संचालक गुलाबराव चव्हाण, तालुका महिलाध्यक्षा प्राची तावडे, न. पं. सभापती संतोष पवार, नगरसेवक रविंद्र तांबे, अक्षता जैतापकर, संताजी रावराणे, दिपक गजोबार, प्रदिप जैतापकर, अशिष रावराणे, शिवाजी राणे, वाहतूक नियंत्रक संजय भोवड व कार्यकर्ते उपस्थित होते.
आ. नितेश राणे म्हणाले, वैभववाडी बसस्थानकाची खुपच दुरावस्था झाली होती. पावसाळ्यात याठिकाणी चालणेही अवघड झाले होते. शासन निधी कधी खर्च होईल तेव्हा होईल. मात्र जनतेला होणारी गैरसोय तात्काळ दुर व्हावी. यासाठीच आम्ही हा जनतेच्या जिव्हाळ्याचा प्रश्न हाती घेतला. बसस्थानकाची झालेली अवस्था आम्ही प्रत्यक्ष पाहीली आहे. जनतेला त्रास म्हणजेच आम्हाला त्रास असे माणणाऱ्या पैकी मी आहे. माजी मुख्यमंत्री खा. नारायण राणे यांचे या तालुक्यावर अफाट प्रेम आहे. येथील जनतेचे राणे कुटुंबाशी राजकारणापलीकडील वेगळे नाते आहे. त्यामुळेच आम्ही विरोधकांप्रमाणे पहाणी दौरे, आश्वासने देत न बसता. तसेच शासकीय निधीचा वाट न बघता आम्ही बसस्थानक प्रश्न मार्गी लावल्याचे आ. नितेश राणे यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, तालुक्यात सुलभ शौचालयाचा विषय ही गंभीर बनला होता. सदर विषयही मी स्वखर्चातून पुर्ण करत जनतेची होणारी गैरसोय दूर केली. विरोधकांनी टिका करत बसण्यापेक्षा आम्ही कामे करतो तशी कामे करा. आमच्याबरोबर स्पर्धा करायचीच असेल तर विकास कामाची करा असा सल्लाही आ. राणे यांनी दिला.

फोटो – वैभववाडी बसस्थानक येथे करण्यात आलेल्या डागडुजी, खडीकरण व सुशोभीकरण कामाचा शुभारंभ करतांना युवा नेते आ. नितेश राणे। सोबत नगरसेवक व स्वाभिमान पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments