वेंगुर्ले : ता.२६
राज्य विज्ञान संस्था नागपूर यांच्यामार्फत वेंगुर्ला येथील पाटकर हायस्कूलमध्ये घेतलेल्या तालुकास्तरीय विज्ञान नाट्यस्पर्धेमध्ये न्यू इंग्लिश स्कूल उभादांडाने प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. या स्पर्धेत वेंगुर्ला तालुक्यातील ८ शाळा सहभागी झाल्या होत्या.
विज्ञान नाट्यस्पर्धेमध्ये न्यू इंग्लिश स्कूल उभादांडाचे एकूणा ८ विद्यार्थी सहभागी झाले होते. सदर विद्यार्थ्यांना अनिल गोवेकर, वैभव खानोलकर, मनाली कुबल यांचे मार्गदर्शन लाभले. नाट्यस्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचे तसेच मार्गदर्शक शिक्षकांचे मुख्याध्यापक उमेश वाळवेकर, संस्था चेअरमन विरेंद्र आडारकर व सर्व संस्था कार्यकारिणी सदस्यांनी अभिनंदन केले आहे.
विज्ञान नाट्य स्पर्धेत उभादांडा न्यू इंग्लिश स्कूलचे यश…
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES