शेवटच्या श्रावणी सोमवारी सागरेश्वर किनाऱ्यावर भाविकांची एकच गर्दी 

231
2

वेंगुर्ले : ता.२६ 
वेंगुर्ले तालुक्यात आज शेवटच्या श्रावणी सोमवार निमित्त ठिकठिकाणी भाविकांनी शिवमंदिरांमध्ये गर्दी केली होती. सागरेश्वर किनारी असलेल्या श्री देव सागरेश्वराचे दर्शन घेऊन भाविकांनी समुद्रकीनारी पर्यटन सफरीचाही आनंद लुटला.
वेंगुर्ले शहरातील श्री रामेश्वर मंदिराबरोबरच, उभादांडा येथील श्री सागरेश्र्वर मंदिरात, शिरोडा वेळागर येथील श्री लिगेश्र्वर मंदीरातही भाविकांनी गर्दी केली होती. सागरेश्वर मंदिर हे उभादांडा समुद्र किनाऱ्यालगत असल्याने मंदिरात दर्शन घेतल्यानंतर भाविक समुद्र किनारी जाऊन पर्यटनाचा आनंदही लुटण्यास विसरत नाहित. आज तर सायंकाळच्या सुमारास पावसानेही विश्रांती घेतल्याने समुद्र किनाऱ्यावर भाविकांनी एकच गर्दी केली होती.

4