Tuesday, February 18, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यासावंतवाडी आगारातील समस्या सोडवा,अन्यथा आंदोलन....

सावंतवाडी आगारातील समस्या सोडवा,अन्यथा आंदोलन….

 

हितवर्धक मंचाचा इशारा:एसटी प्रशासनाला आगार व्यवस्थापकांना निवेदन…

सावंतवाडी ता.२६: शहरातील एस.टी आगार परिसरातील अस्वछता तसेच इतर समस्यां येत्या दोन दिवसात सोडवा,अन्यथा सावंतवाडी शहर हितवर्धक मंचच्या वतीने आंदोलन करण्यात येईल,त्याचे गँभिर परिणाम संबंधित प्रशासनासनाला भोगावे लागतील,असा इशारा सुरेश भोगटे यांनी आज येथे दिला.आज शहरवासीय व हितवर्धक मंचच्या वतीने आगार व्यवस्थापक आय.बी.सय्यद यांना घेराव घालण्यात आला.यावेळी प्रवाशांच्या विविध समस्या सोडविण्या संदर्भात त्यांना लेखी निवेदन देण्यात आले.
येथील बस स्थानकावर रात्रीचे २ वाजेपर्यत प्रवासी असतात यावेळी कोणतेही अनुचित प्रकार घडू शकतात.आपले गार्ड कुठे फिरताना दिसत नाही.एस टी प्रशासनाने एवढा हलगर्जी पणा का करावा,या प्रकाराबाबत नागरिकात संताप व्यक्त होत आहे.शौचालयच्या परिसरात दुर्गधी आहे,स्वछता गृहांची स्वछता करण्यात येत नाही.वासामुळे नागरिक हैराण होत आहेत.वरिष्ठांकडून स्वछता झाली की नाही त्याची साधी पहाणी होत नाही .त्यामुळेच असे प्रकार होत आहेत.स्वछता बघितल्याशिवाय त्याचे मानधन काढू नका,असे खडे बोल सुरेश भोगटे यांनी सुनावले.
यावेळी सय्यद यांनी तात्काळ स्वछता कर्मचारी यांना बोलावून घेत जाब विचारला.कामाचा पगार मिळतो मग ही स्थिती का असा प्रश्न उपस्थित करण्यात आला.स्वछता गृहावर फलक नाहीत त्यामुळे महिला प्रवाश्याची लूटमार होतेय स्वछता गृहाच्या आतमध्ये बोर्ड लावून उपयोग तरी काय बाहेरच्या बाजूला बोर्ड प्रिंट करून लावा,असे सय्यद याना यावेळी सांगण्यात आले.
यावेळी माजी नगरसेवक सुरेश भोगटे, पक्ष राष्ट्रवादी शहराध्यक्ष सत्यजित धारणकर, माजी नगरसेविका अफरोज राजगुरू, सचिन इंगळे, बंड्या तोरस्कर , सतीश नार्वेकर रिक्तिका राजगुरू, संजय पेडणेकर उद्दीन सौदागर नितेश सावंत राघवेंद्र सावंत आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments