सावंतवाडीत होणा-या सुरक्षा रक्षक केद्रांचा भूमिपूजन समारंभ उदया

2

सावंतवाडी.ता,२७: पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या संकल्पनेतून येथील पोलीस परेड मैदानावर उभारण्यात येणाऱ्या सुरक्षा रक्षक केंद्राचा पायाभरणी समारंभ उद्या होणार आहे.दुपारी तीन वाजता या इमारतीचा भूमिपूजन समारंभ होणार आहे.याबाबतची माहीती पालकमंत्री केसरकर यांच्या कार्यालयातून देण्यात आली.
तब्बल दोन कोटी रुपये खर्च करून या ठिकाणी सुरक्षा रक्षक केंद्र उभारण्यात येणार आहे.राज्यस्तरावरील प्रशिक्षणार्थी डोळ्यासमोर ठेवून उभारला जाणारा हा प्रकल्प सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आदर्श ठरणार आहे.
या ठिकाणी वर्षाकाठी २००० हून अधिक सुरक्षारक्षक प्रशिक्षित केले जाणार आहे.

23

4