अद्याप निवड नाही; सुरेश गवसांची तलवार मात्र म्यान…
सावंतवाडी/अमोल टेंबकर ता.२७: राष्ट्रवादी पक्षाला राज्यात फोडाफोडीचे ग्रहण लागलेले असताना विद्यमान अध्यक्षांची तडकाफडकी हकालपट्टी करून बदल करण्यात आलेली जिल्ह्याच्या राष्ट्रवादी जिल्हाध्यक्षांची “गादी,” अद्यापपर्यंत रिकामीच आहे.तर आठवड्याभरात आपली भूमिका जाहीर करू असा इशारा देणा-या सुरेश गवस यांनी मात्र आपली तलवार म्यान केली आहे.
मध्यंतरी जिल्ह्यात झालेल्या अदलाबदलीच्या नाट्यानंतर प्रविण भोसले,आबीद नाईक,अमित सामंत अशी काही नावे चर्चेत आली होती परंतु पक्षाकडून अद्याप पर्यंत कोणतीही नाव जाहीर न करण्यात आल्यामुळे आता विधानसभेच्या तोंडावर जिल्हाध्यक्षपदाची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडते याकडे सगळ्यांचे लक्ष राहिले आहे. तर दुसरीकडे त्या ठिकाणावरून पाय उतार यांच्या राजीनाम्यानंतर त्याठिकाणी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष म्हणून सुरेश गवस यांची नेमणूक करण्यात आलेली होती.परंतु मध्यंतरीच्या काळात झालेल्या उलथापालथीत गवस यांच्या टीमचे त्यांच्याशी पटले नाही.तर माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले हे पक्षापासून दूरच राहिले त्यानंतर झालेल्या राजकीय परिस्थितीत श्री.गवस यांची तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आली.व त्यांना प्रदेश राष्ट्रवादीच्या सदस्यपदी नेमणूक करण्यात आली.त्यामुळे या सर्व परिस्थितीत पक्षात जोरदार खळबळ माजली.
श्री.गवस यांनी आपल्यावर पक्षाकडून अन्याय झाला आहे.असा आरोप करीत आपण लवकरच अन्य पक्षात प्रवेश करू असा इशारा दिला होता. परंतु अद्याप पर्यंत त्यांनी कोणताही तसा निर्णय घेतलेला नाही तर दुसरीकडे रिकाम्या झालेल्या जिल्हाध्यक्ष पदासाठी आबिद नाईक यांच्यासह अमित सामंत व राज्यमंत्री प्रवीण भोसले यांचे नाव चर्चेत होते.तर काही ठिकाणी अमित सावंत यांची येत्या काही दिवसात निवड होईल अशी चर्चा होती परंतु अद्याप पर्यंत याबाबत कोणतीही भूमिका घेतलेली नाही.येणाऱ्या काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुका लक्षात घेता स्वतःहून जिल्हाध्यक्षपदासाठी कोणीही तूर्तास तरी इच्छुक नसल्याचे कार्यकर्त्यांतून सांगण्यात येत आहे.तर काही ठिकाणी इच्छुक असलेली नावे पक्षाने जबाबदारी दिली तर घेऊ असे म्हणून आपल्यावर पडणारी जबाबदारी तोलण्याचा प्रयत्न करत आहेत.येत्या काही दिवसांनी विधानसभा निवडणुका आहेत.परंपरेप्रमाणे सावंतवाडी विधानसभेची जागा राष्ट्रवादीच्या कोट्यात येते त्यामुळे आयत्यावेळी ही जागा राष्ट्रवादी यात काही शंका नाही परंतु आयत्यावेळी स्वबळाची भाषा काँग्रेसकडून झाल्यास नेमके काय याची परिस्थिती लवकरात लवकर या ठिकाणी जिल्हाध्यक्ष निवडणे गरजेचे आहे असे कार्यकर्त्यांचे मत आहे येणाऱ्या काळात पक्ष संघटना मजबूत राहिली त्यासाठी पक्षश्रेष्ठींकडून योग्य तो सकारात्मक निर्णय घेण्यात यावा अशी मागणी कार्यकर्त्याचा होत आहे त्यामुळे गेले काही दिवस रिकाम्या असलेल्या जिल्हाध्यक्ष पदावर नेमकी कोणाची वर्णी लावली जाते हे पाहणे धोक्याचे ठरणार.