वित्त समितीला अनुपस्थित खातेप्रमुखांवर नाराजी

2

सीईओनी कारवाई करण्याची मागणी

सिंधुदुर्गनगरी.ता,२६: वित्त समितीला बहुसंख्य खातेप्रमुख गैरहजर राहिल्याने सदस्यानी तीव्र नाराजी व्यक्त करतानाच ज्या विभागाचे प्रतिनिधी उपस्थित असतील त्यांनी सभागृहाबाहेर जावे, असे सांगितले. अधिकारी आपल्या सभा घेत असतील तर सभागृहात सदस्य वेळ जात नाही म्हणून येतात का ? असा प्रश्न केला. अखेर सभेला दांडी मारणाऱ्या खातेप्रमुखांवर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कारवाई करावी, अशी मागणी करतानाच त्यांनी कारवाई केली नाहीतर आम्ही आमच्या पद्धतीने कारवाई करू असा इशारा यावेळी देण्यात आला.
जिल्हा परिषदेच्या नाथ पै सभागृहात सभापती जेरॉन फर्नांडिस यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या सभेला मुख्य लेखा व वित्त अधिकारी गौतम जगदाळे, सदस्य संतोष साटविलकर, रविंद्र जठार, संजय देसाई, महेंद्र चव्हाण, अनघा राणे यांच्यासह अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. यावेळी माझी अर्थमंत्री अरुण जेठली यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी पुरहाणी मधून रस्त्यातील खड्डे बुजविण्यासठी तयार करण्यात आलेल्या यादिवर सभागृहाने तीव्र आक्षेप घेत यादी मंजूर नसल्याचे सांगितले. यावेळी साटविलकर, जठार, गणेश राणे, अनघा राणे, चव्हाण या सदस्यानी आक्रमक होत प्रभारी कार्यकारी अभियंता अनामिका जाधव यांना धारेवर धरले. यानंतर सर्व तालुक्यांच्या उपअभियंता यांना सभागृहात पाचारण करण्यात आले. त्यांना याबाबत जॉब विचारण्यात आला. अखेर आजच्या आज तालुका स्तरावरून आलेली सर्व यादी जिल्हाधिकारी यांच्याकडे मान्यतेसाठी पाठविण्याचे आदेश सभापती फर्नांडिस यांनी दिले.

0

4