बॅ नाथ पै सेवांगणच्यावतीने पुरग्रस्त काळसे बागवाडी शाळेला शैक्षणिक साहित्याचे वितरण

2

सिंधुदुर्गनगरी.ता,२७: ऑगस्ट महिन्यात आलेल्या पुराने बाधित झालेल्या काळसे बागवाडी शाळेतील मुलांना बॅ नाथ पै सेवांगणच्यावतीने मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. एकीकडे पुरबाधित व्यक्तींना आर्थिक व वस्तुरूपाने मदतीचा ओघ सुरु असतानाच विशेषतः शैक्षणिक क्षेत्रात गेली अनेक वर्षे सामाजिक भावनेतून कार्यरत असलेल्या पुरबाधित बागवाडी शाळेतील मुलांना थेट शैक्षणिक साहित्याचे वाटप करीत आपल्या परीने मदतीचा हात पुढे केला आहे.
यावेळी काळसे गावचे सरपंच केशव सावंत, ग्रा. पं. सदस्य अर्चना प्रभु व अनुष्का हेरेकर, शाळा व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष सतिश माडये, उद्योजक भाऊ नार्वेकर, तज्ञ मार्गदर्शिका गौरी नार्वेकर , मुख्याध्यापिका शीतल परूळेकर, शिक्षक महेश कदम, पालक, विद्यार्थी सेवांगणच्यावतीने किशोर शिरोडकर व दीपक भोगटे उपस्थित होते.

20

4