भंडारी समाजातील विद्यार्थ्यांनी मिळविलेले यश उल्लेखनीय

2

रमण वायंगणकर : वेंगुर्ले भंडारी समाज ऐक्य वर्धक मंडळातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव

वेंगुर्ले.ता,२७: भंडारी समाजातील विद्यार्थ्यांनी मिळविलेले यश उल्लेखनीय आहे. यापुढेही विद्यार्थ्यांनी भविष्यात अथक परिश्रम व योग्य मार्गदर्शनाच्या जोरावर उच्च पदावर जावे. अशा गुणवंत विद्यार्थ्यांना मंडळ मार्गदर्शन करण्यास सदैव प्रयत्नशील राहील, असे प्रतिपादन मंडळाचे अध्यक्ष रमण वायंगणकर यांनी केले.
भंडारी समाज ऐक्य वर्धक मंडळ वेंगुर्ले यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम येथील साईदरबार मंगल कार्यालयात संपन्न झाला. यावेळी मंडळाचे उपाध्यक्ष अँड.शाम गोडकर, उद्योजक सुरेश बोवलेकर, रमण किनळेकर यांनी विद्यार्थी वर्गाला मार्गदर्शन केले. वेंगुर्ले तालुक्यातील हायस्कुल-महाविद्यालय मधील भंडारी समाजातील प्रथम तिन क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थी-विद्यार्थीनींचा प्रमाणपत्र, भेटवस्तू व गुलाबपुष्प देऊन गौरव करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर मंडळाचे अध्यक्ष रमण वायंगणकर, उपाध्यक्ष अॅड.नारायण उर्फ शाम गोडकर, उद्योजक सुरेश बोवलेकर, रमण किनळेकर, उपाध्यक्ष चंद्रकांत गडेकर, दत्ताराम नार्वेकर, प्रा. आनंद बांदेकर, सत्यवान साटेलकर, नगरसेवक आत्माराम सोकटे, रमेश नार्वेकर, विकास वैद्य, दिनेश तांडेल, राजेंद्र कांबळी, जयराम वायंगणकर आदी उपस्थित होते. प्रास्तविक आनंद बांदेकर, सुत्रसंचालन प्रा.सचिन परूळकर तर आभार गुरुदास तिरोडकर यांनी मानले.

0

4