मालवण तहसीलदार पाटणे यांचे साळेल येथे प्रतिपादन
सिंधुदुर्गनगरी.ता,२७: पंतप्रधान किसान मानधन योजनेबाबत थेट ग्रामस्थांना भेटून माहिती देण्यासाठी मालवण तहसीलदार अजय पाटणे, तालुका कृषि अधिकारी विश्र्वनाथ गोसावी, कृषी पर्यवेषक चौधरी यांचे सह मालवण तालुक्यातिल साळेल ग्राम पंचायतीस नुकतीच भेट देण्यात आली.
प्रधानमंत्री किसान मानधन योजना संपूर्ण देशात ९ ऑगस्ट २०१९ पासुन सुरू करण्यात आली असुन या योजनेसाठी १८ ते ४० वर्षापर्यंत २ हेक्टर शेती असलेल्या राज्यातील सर्व अल्पभूधारक व सिमांत शेतकारी पात्र आहेत. लाभार्थ्यांना ६० वर्षे पूर्ण झाल्या नंतर ३००० रूपये दर महा पेंन्शन मिळणार आहे.तसेच लाभार्थ्याच्या मृत्युपच्छात त्याच्या कुटूंबियांना निवृत्ती वेतन मिळणार आहे, असे तहसिलदार अजय पाटने यांनी यावेळी सांगितले. या पूर्वीच्या पंतप्रधान किसान सन्मान योजने अंतर्गत ६०००रूपये प्रती वर्षी मिळण्यासाठी ज्यांनी अर्ज सादर केले असतील त्यांनाहि या योजनेचा लाभ मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. जास्तित जास्त शेतकरी बांधवांनी या दोन्ही योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
साळेल गावातील कायम कुळ वहिवाटदार असणाऱ्या शेतकऱ्यांना याचा लाभ घेता येणार आहे.
यावेळी पंचायत समिती सदस्य कमलाकर गावडे, साळेल सरपंच सौ साक्षी जाधव, उपसरपंच रविंद्र साळकर, पोलीस पाटील रविंद्र गावडे, सिंधुदुर्ग जिल्हा जेष्ट नागरिक संघ मालवण शाखा अध्यक्ष राम धनावडे, एस आर कुंवर, तसेच सुर्यकांत गावडे, रविंद्र परब, गणेश गावडे, भुषण गावड़े, सौ विनीता गावड़े, रामचंद्र परब, चंद्रकांत ठोंबरे, अंकुश परब, सत्यवान दळवी, रोशन गावड़े, बजरंग गावड़े, सुदन पडवळ तसेच जाधववाडी आणि नांगरभाट वाडितील महिला शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन व सुत्रसंचलन कृषी सहाय्यक धनंजय गावडे यांनी केले.