मुंबई चर्चगेट येथील के. सी. कॉलेजची पूरग्रस्तांना मदत

131
2
Google search engine
Google search engine
Google search engine

जीवनावश्यक वस्तूंचे किट वैभववाडी पूरग्रस्त समितीकडे सुपुर्द

वैभववाडी.ता,२७: नैसर्गिक आपत्तीत संकटात सापडलेल्या कोल्हापूर, सांगली पुरग्रस्तांना मुंबई येथील सुप्रसिद्ध के. सी. कॉलेजच्या वतीने मदतीचा हात देण्यात आला आहे. पुरग्रस्तांसाठी लागणाऱ्या सर्व जीवनावश्यक वस्तूंचे किट व कपडे के. सी. कॉलेजने वैभववाडी पुरग्रस्त समितीकडे सुफुर्द केले आहे. सामाजिक बांधिलकी जोपासत मदत करणाऱ्या या कॉलेजचे वैभववाडीवासियांनी कौतुक केले.
किशनचंद चेलाराम कॉलेज चर्चगेट मुंबई प्राचार्य डॉ. हेमलता बागला, उपप्राचार्य समरजीत यांच्या मार्गदर्शनाखाली कॉलेजच्या शिक्षक व विद्यार्थ्यांनी यापूर्वी कोल्हापूर जिल्ह्यातील बसतीवाड, शिर्ती व मेरवाड या गावात प्रत्यक्ष जाऊन पुरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तू व कपड्यांचे वाटप केले. पुढील टप्यात वाटप करण्यात येणारी मदत कॉलेजने वैभववाडी पुरग्रस्त समितीकडे सुफुर्द केले आहे. यावेळी केसी कॉलेज एनएसएस विभाग प्रकल्प अधिकारी डॉ. सतीश कोलते, सुहास गावडे, नितीन सातपुते, विजय मोरे व श्री तारकर व काँलेजचे ३४ विद्यार्थी तसेच वैभववाडी सभापती लक्ष्मण रावराणे, व्यापारी मंडळ अध्यक्ष मनोज सावंत, डॉ. राजेंद्र पाताडे, विद्याधर सावंत, गंगाधर केळकर व समिती सदस्य उपस्थित होते. वैभववाडी पुरग्रस्त समिती व वैभववाडीवासियांनी पुरग्रस्तांना थेट मदत पोहचविण्याचे काम केले आहे. आतापर्यंत दोन टप्प्यात दोन ट्रक जीवनावश्यक वस्तू व कपडे सदस्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील पुरग्रस्तांच्या घरी जावून पोच केले आहे. समितीच्या पारदर्शक कारभारचे सर्वत्र कौतुक होत आहे. तसेच मदतीचा ओघ अजूनही सुरू आहे. तिसऱ्या टप्प्यातील मदतीची पुर्ण तयारी झाली आहे. लवकरच पुरग्रस्त भागात वैभववाडीवासिय जावून मदतीचे वाटप करणार आहेत.

फोटो- पुरग्रस्तांसाठी जीवनावश्यक वस्तूंचे संच के. सी. कॉलेज चर्चगेट यांनी वैभववाडी पुरग्रस्त समितीकडे सुफुर्द केले.

\