सिंधुदुर्ग विद्यानिकेतन “इंटरॅक्ट डिबेट” स्पर्धेत सानिका नेरुरकरचे यश…

2

वेंगुर्ले : ता.२७
वेंगुर्ले येथे सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूल व इंटरॅक्ट क्लब आयोजित डिबेट काॅम्पीटिशनमध्ये बेस्ट डिबेटर चषक सानिका नेरुरकर व अॅक्टिव्ह स्पीकर चषक सानिया आंगचेकर यांनी पटकावला. यांच्यासह अन्य विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
या स्पर्धेत सहभागी संघातून, ब्ल्यू हाऊस संघाच्या चिन्मयी आंगचेकर, सानिया आंगचेकर, विल्सन पाॅल, निरज आरोसकर यांनी विजेतेपद पटकावले. उपविजेतेपद ग्रीन हाऊसच्या ऊर्वी आंदुर्लेकर, समिरा शेख, आदित्यराज सावंत, श्रेयस टाककर यांनी पटकावले. विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते रोटरी क्लब आॅफ वेंगुर्ला मिडटाऊनच्यावतीने चषक देवून गौरविण्यात आले. यावेळी रोटरी डिस्ट्रिक्ट आॅफिसर संजय पुनाळेकर, सिंधुदुर्ग विद्यानिकेतन उपाध्यक्ष इर्शाद शेख, रोटरी क्लब वेंगुर्ला मिडटाऊनचे सेक्रेटरी सुरेंद्र चव्हाण, पदाधिकारी डाॅ. आनंद बांदेकर, सुनिल रेडकर, प्रा.प्रकाश शिंदे, प्रा. सदाशिव भेंडवडे, पंकज शिरसाट, मुख्याध्यापिक मनिषा डिसोझा, उप मुख्याध्यापिका मानसी आंगणे, रोटरॅक्ट प्रेसिडेंट हेमंत गावडे, शिक्षक व पालक वर्ग उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इंटरॅक्टर कुमारी सानिका आंगचेकर व आभार चिन्मयी आंगचेकर आणि मान्यवरांचे स्वागत कोआॅर्डीनेटर नितीन कुलकर्णी यांनी केले.

1

4