सावंतवाडीत होणाऱ्या सुरक्षा केंद्राच्या माध्यमातून वर्षाकाठी चोविसशे सुरक्षारक्षक घडतील

2

जय जाधव: भूमिपूजन कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषदेत दिली माहिती

सावंतवाडी ता 29
येथील पोलीस मैदानावर होणाऱ्या राज्य सुरक्षा रक्षक केंद्राच्या माध्यमातून वर्षाकाठी 2400 हून सुरक्षारक्षक प्रशिक्षित होणार आहेत. त्याचा फायदा पोलिसांच्या दलाला होणार आहे,अनेकांना रोजगाराच्या संधी मिळणार आहेत असा दावा सुरक्षारक्षक केंद्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डाॅ.जय जाधव यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केले.
दरम्यान या प्रशिक्षण केंद्र अंतर्गत प्रशिक्षण घेणाऱ्या संबंधित सुरक्षारक्षकांना अटकेचे अधिकार, शस्त्र वापरण्याची परवानगी व विशेष म्हणजे आठ तासाचीच ड्युटी आदी सेवा देण्यात येणार आहेत त्यामुळे याचा फायदा राज्यातील तरुणांना होणार असाही विश्वास यावी जाधव यांनी व्यक्त केला.
येथील पोलिस मैदानावर उभारण्यात येणाऱ्या सुरक्षारक्षक प्रशिक्षण केंद्राचे भूमिपूजन उद्या पालकमंत्री तथा गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते होत आहे. या पाचशेवर या केंद्राबाबत माहिती देण्यासाठी आज प्रशिक्षण महामंडळाच्यावतीने येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी श्री जाधव बोलत होते याप्रसंगी पोलिस महासंचालक कनकरत्नम, प्रशिक्षण केंद्राचे पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे, सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित कुमार गेडाम,सावंतवाडी पोलीस निरीक्षक सुनील धनावडे आदी उपस्थित होते.
यावेळी श्री जाधव म्हणाले सावंतवाडी येथील पोलीस परेड मैदानाच्या साडेचार एकर क्षेत्रात हे प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येणार आहे यासाठी सध्याच्या वापरात असलेली बहुउद्देशीय व व्यायाम शाळेची इमारत वापरण्यात येणार आहे त्याचबरोबर पोलीस वसाहतीच्या बाजूला असलेल्या जागेत नव्याने बांधकाम करून तेथील भाग काही वापरण्यात येणार आहे वर्षाकाठी या केंद्राच्या माध्यमातून तब्बल दोनशे सुरक्षारक्षक तयार करण्यात येणार आहेत.त्या सुरक्षारक्षकांना रिझर्व बँक मेट्रो न्यायालय तशा सरकारी व निमसरकारी कार्यालयात नोकरी करण्याच्या संधी मिळणार आहे. ही नोकरी करत असताना आठ तास ड्युटी हा नियम लावण्यात येणार आहे. याठिकाणी प्रशिक्षणादरम्यान उमेदवारांना लाठीकाठी ट्रेनिंग शस्त्र कायद्याचा अभ्यास बॉम्ब कसा हाताळणी संवाद कौशल्य हत्यारे कशी वापरणे आधी सह आपत्कालीन परिस्थितीत काय करावे याबाबत माहिती देण्यात येणार आहे त्यामुळे त्याचा फायदा भविष्यात सिंधुदुर्ग जिल्ह्याला होणार आहे असा विश्वास सुद्धा श्री जाधव यांनी व्यक्त केला

13

4